तसबीर जशी धुरळावी, मी तसे मळवतो कपडे!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 July, 2012 - 07:43

गझल
तसबीर जशी धुरळावी, मी तसे मळवतो कपडे!
बदलतो हार फोटोचा, मी तसे बदलतो कपडे!!

उडतेच धूळ शब्दांची, माखतोच मी निंदेने;
बाहेर पडायापूर्वी, मी रोज झटकतो कपडे!

पायघोळ होती तेव्हा, दुमडतो मनाची वस्त्रे!
जखडल्यासारखे होते, तेव्हाच उसवतो कपडे!!

एरव्ही कसाही असतो पेहराव अंगावरती;
करकरीत कोरे जेव्हा असतात......मिरवतो कपडे!

ऎपतीप्रमाणे घेतो, निगुतीने अन् वापरतो;
का जगास वाटत आहे?....मी किती गुधडतो कपडे!

काळजी घेवुनी सुद्धा, पडतात डाग पानांचे;
चुकवून नजर पत्नीची, मी रोज भिजवतो कपडे!

मापेच बदलती माझी! करणार काय तो शिंपी?
परवडत नसोनी देखिल, दरवर्षी शिवतो कपडे!

कुठलाही कपडा माझा, मज आता होतच नाही!
मी वेळ साजरी करतो, अन् तेच दडपतो कपडे!!

माझे कपाट भरलेले...ना होणा-या कपड्यांनी!
खुश बोहारीणच होते, मी तिलाच विकतो कपडे!!

धांदलीत आयुष्याच्या, बसतातच काही हिसके!
दररोज रफू करतो मी....दररोज टाचतो कपडे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

ही गझल कधीची आहे??? >>>>> शामजी तुम्हाला हा प्रश्न तरी सुचला हे नशीब! .. माझ्यासारख्याने काय करावे? DesiSmileys.com

देवसर अशक्य आहात तुम्ही
तुमच्या अशक्यपणाला त्रिवार मुजरा

_/\_ _/\_ _/\_

असो निगुती आणि गुधडतो चा अर्थ सान्गाल का
माझ्याकडे कोणतीही डिक्शनरी नाही आहे ना आणि तसेही माहीत असलेले बरे नै का ........म्हणून विचारत आहे ..........गैरसमज नसावा

(तसेही तुम्हाला हे महीत आहेच की मी माझी स्वतःची डिक्शनरी तयार करत असतो दुसर्‍याने केलेली वापरत नाही Wink )

वैवकुजी!
आमच्यातल्या शक्य-अशक्यतेच्या आपणास झालेल्या साक्षात्काराबद्दल आपणास दंडवत!
आपण विचारलेल्या दोन शब्दांचे अर्थ देत आहे. दोन्ही शब्द बोलीभाषेतील प्रचलीत शब्द आहेत(स्थलकालनिरपेक्ष).

निगुतीने: म्हणजे काळजीपूर्वक ठेवणे, उपयोग करणे.
निगुती / निगुताई: म्हणजे दक्षता, काळजी, सावधपणा, यथार्थता, युक्ती.

गुधडणे: म्हणजे दामटणे, दांडगाईने नासणे, चुरगळा करणे, पायाने तुडविणे इत्यादी.........
टीप: अशक्यतेची फोड केलीत तर सोयीचे होईल! हवेत गोळीबार थांबवावा.
गझलेत सर्व रोखठोक असते. गुळमुळीतपणा आमच्या स्वभावात नाही.
..................................................................................................

शामराव!
आपणास काय बोलावे हे सुचेनासे झालेले वाचून मी अवाक झालो आहे!
गझल कोणत्या काळातील आहे याने काय फरक पडतो?
आपले मत परखडपणे, हवेत गोळीबार न करता मांडले तर माझ्या ज्ञानात भर तरी पडेल..........

.................................................................................................

देवसर ..
खरे म्हणजे तुमच्या अतापर्यंतच्या गझला आणि ही गझल या मध्ये खुपच फरक आहे. एक प्रकारे आपल्या रोजनिशीच वर्णन सांगत असल्याप्रमाणे. आणि तुमच्याकडून अशी अपेक्षा कधीच शक्य न्हवती. त्यामुळेच काहींचा हवेत गोळीबार झाला असावा. परंतू गझलेचा हा विषय वर वर साधा वाटला तरी आपण त्यात काही वेगळं सागण्याचा प्रयत्न करत असाल असे मला वाटते. इथे तुम्ही 'कपडे' हा शब्द कोणत्या अर्थाने घेता (उदा: चारित्र्य-स्वाभिमान, मन इ. मला भवलेले.) असे असता --

कुठलाही कपडा माझा, मज आता होतच नाही!......

किंव्हा.....
कपाट भरलेले...ना होणा-या कपड्यांनी!
खुश बोहारीणच होते, मी तिलाच विकतो कपडे!!.
.......................हा एक तसाच. यांचा संदर्भ काय? इत्यादी गोष्टी आपणच स्पष्ट कराव्यात हे बरे.

ऑर्फिअसजी!
प्रथम आपले अभिनंदन करतो, कारण आपण आपली प्रांजळ मते कुणाचीही तमा न बाळगता मांडलीत.
“कपडे” हा जो रोज वापरातला शब्द(वस्तू) रदीफ म्हणून इथे वापरला आहे, त्याला अनेक अर्थ संभवतात, हे आपण बरोबर ताडलेत.

आता कोणत्या शेरातील रदीफचा काय लाक्षणीक अर्थ आहे, हे मी वाचकांवर सोडतो. सर्वात शेवटी मी माझ्या गझलेची विस्ताराने फोड करेन (हवी असेल तर).
शिवाय या गझलेतील काफियेही बरेच काही सांगून जातात.
काही गोष्टींचा खुलासा करतो.............

१) एका शायराच्या वेगवेगळ्या गझलांमधे फरक हा असतोच! इतकेच काय, एका गझलेतील वेगवेगळ्या शेरांतही फरक असतोच. कारण प्रत्येक शेर हा जीवनाचा एक वेगळा प्रत्यय असतो. त्याची चवही वेगळी असू शकते. तो शेर वेगवेगळ्या मानसिक अवस्थेत लिहिलेला असू शकतो.
२) गझलेतला/शेरातला “मी” म्हणजे स्वत: कवीच असतो असे नव्हे. तो “मी” हा प्रातिनिधिक असतो.
३) रदीफच मुळी “कपडे” असा असल्याने विविध शेरांमधील प्रतिमासृष्टीही ओघाने संलग्न अशीच आलेली आहे. ती रदीफाचीच मागणी आहे. “कपडे” विषय सोडून इतर प्रतिकांचा इथे उपयोगच नाही.
४) वेगवेगळे शेर एकमेकांना कधीच जोडायचे नसतात, गैरमुसलसल गझलेत.
५) कोणताही शेर निवडावा व ती स्वयंपूर्ण दर्जेदार कविता आहे की, नाही ते पहावे.
६) रोजच्या वापरण्यात येणारी वस्तू म्हणजे “कपडे” रदीफ असल्याने आपणास ती माझी/एखाद्याची रोजनिशी वाटत असावी. इथे कुणाच्याही रोजनिशीचे वर्णन नाही.
७) एकेक शेर घेवून त्यातील सौंदर्याची फोड करू शकतो, पण ती ब-याच लोकांना आत्मस्तुती वाटेल, म्हणून आता येथे टाळतो. पण लोकांना हवे असेल तर तेही मी करायला तयार आहे.
८) इथे फक्त काही प्रतिमांच्या सौंदर्यस्थळांचा ओझरता उल्लेख करतो.आपण (हे मी आपणास आणि फक्त आपणास हक्काने सांगत आहे.) त्या प्रतिमांवर सखोल चिंतन करावे. बाकीचे नंतर सविस्तर बोलू!
खालील प्रतिमा या नोंद घेण्याजोगा व चिंतनीय आहेत................
तसबीरीचे धुरळणे आणि कपडे तसेच मळवणे,
फोटोचा हार बदलणे व स्वत:चे कपडे बदलणे.
शब्दांची धूळ, निंदेने माखणे , कपडे झटकणे ,
वस्त्रे पायघोळ होणे व तेव्हा ती दुमडणे.
जखडल्याची भावना व कपडे उसवणे,
करकरीत कोरे असताना कपडे मिरवणे;
निगुतीने ऎपतीनुसार घेतलेले कपडे वापरणे.
कपडे गुधडणे,
पानांचे डाग पडणे,
पत्नीची नजर चुकवून कपडे भिजवणे
मोजमाप बदलणे
दरवर्षी नवे कपडे शिवायला लागणे
कुठलाच कपडा अंगाबरहुकूम न होणे
वेळ साजरी करणे,
कपडे दडपणे/दडपून वापरणे
न होणा-या कपड्यांनीच कपाट भरलेले असणे व ते कपडे बोहारणीलाच विकायची पाळी येणे.
आयुष्याच्या धांदलीत बसणारे हिसके
रोज कपडे फाटणे/हिसकणे/ आणि रफू करणे/टाचणे इत्यादी.
टीप: मतल्यातील तसबीर, फोटो आणि माझे कपडे मळवणे आणि बदलणे या प्रतिमासृष्टी काय फक्त कपड्यांचे वर्णन करत आहेत का?
मतल्यातील प्रतिमांशी तादात्म्य होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मतल्यातील सौंदर्याचे आणि अनुभुतीचे तरंग आपल्याही मनात तात्काळ उठतील. असो.
उरलेले नंतर बोलूच!
थांबतो!
...........प्रा.सतीश देवपूरकर

>>>>>देवपुरकर सर,

केवळ आपल्या ज्ञान लालसेपोटी मी माझ्या प्रतिसादाचे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषन करत आहे.
तर ही माझी दोन वाक्ये...
काय बोलावं काहीच सुचेनासं झालयं...
ही गझल कधीची आहे???

ही दोन्हीही वाक्ये हवेतले गोळीबार नसून आपली गझल वाचल्या नंतर मनाची झालेली अवस्था प्रतिपादीत करत आहेत.

पहिल्या वाक्यात माझी गझलेबाबतची प्रथमदर्शनि प्रतिक्रीया आहे.... या वाक्याचा लक्षार्थ असाआहे की,
आपली गझल वाचुन मी अवाक झाल्याने शब्दच उमटत नाही आहे, अता माणूस अवाक होण्याचे वेगवेगळे प्रसंग असले तरी जवळचे माणूस गेल्यावर, निवर्तल्यावर, मेल्यावर, कालवश झाल्यावर, देवाघरी गेल्यावर किंवा देवाज्ञा झाल्यावेर अत्यंतीक दु:खाने शब्द फुटू नये...असे काहिसे झाले.
म्हणून काय बोलावे ते सुचले नाही आणि तेच मी व्यक्त केले.... इथे अपेक्षा भंगासाठी , माणूस मरणे हे प्रतिकात्मक रित्या वापरले आहे हे आपणास सांगणे न लगे.... थोडक्यात भरवश्याच्या म्हशीला टोणगा झाल्याचे हे दु:ख मी शब्दातून व्यक्त केले आहे.....

दुसर्‍या ओळीचे विश्लेषण वीजेच्या भारनियमनामुळे पुढे ढकलत आहे...... क्षमा असावी

..................................................शाम

शमराव मस्त प्रतिसाद .........
_______________________________________

खालील प्रतिमा या नोंद घेण्याजोगी व चिंतनीय आहे...........

हवेत गोळीबार करणे>>>>>

या वाक्प्रचाराचा प्रा. देवपूरकर यांज कडून सर्रास वापर केला जातो .दुसर्‍याला नामोहरम करण्यासाठी ते हा वाक्रचार वापरताना दिसतात
यात सौन्दर्यशास्त्रीय बोध आहेच आहे पण यात त्यांच्या रोजच्या जगण्याचाही प्रत्यय येत असावा की काय याचे मी विश्लेषण कारान्याचा प्रयत्न केला ....................
..... असे पहा ; की देवसर आपले नाव+नंबर+कामाचे पद + ठिकाण लपवून ठेवत नाहीत हे आपणास माहीत आहेच पण घराचा पत्ता द्यायचा राहून जातो( प्लीज चुकीचा अर्थ काढू नये ....विस्मृतीने नव्हे तर माबोपृष्ठावरील जागाव्याप्तीभयानेही असे होते म्हणे !! ). म्हणून ते फक्त गोळीबार गोळीबार इतकेच म्हणातात असा आम्हाला सन्शय आहे
यावरून लक्षात येते की देवसर पुण्यात राहातात ते ठिकाण गोळीबार मैदानाजवळ असणार (म्हणूनच रोज रोज ऐकावा लागणारा गोळीबार ऐकून त्यांचे कान पकले असावेत व माबोवरही तेच ते ऐकायला मिळते म्हणून गोळीबार करू नका गोळीबार करू नका असे ते सांगत सुटत असावेत !!)

वि.सू.:हा मी हवेत केलेला गोळीबार आहे केवळ
गै न.