Submitted by वैवकु on 12 July, 2012 - 10:05
होता होता झाले नाही
नशीब कामी आले नाही
मी होता खोलला पिंजरा
पाखरू तरी उडाले नाही
मी म्हटले "...मग एक गझल दे!"
जीवन पुन्हा म्हणाले..."नाही!"
रडल्यावर मी चाचपलेही
काळिज कुठे मिळाले नाही
झाले गेले विसरू म्हणता
झाले हेच कळाले नाही
गुलमोहर:
शेअर करा
झाले गेले विसरू म्हणता झाले
झाले गेले विसरू म्हणता
झाले हेच कळाले नाही
वावा!
(अवांतर - खयाल अधिक सुस्पष्टपणे व सुलभ होतील असे वाटते. कृ गै न)
छान...
छान...
मतला सहज-सुंदर!
मतला सहज-सुंदर!
बेफीजी , अरविंदजी,
बेफीजी , अरविंदजी, सुप्रियाताई, धन्यवाद !!
बेफीजी : आपण सान्गत आहात त्या मुद्द्यावर यथामती..यथाबुद्धी माझे चिन्तन चालू आहे.
बदल सुचल्यास अवश्य करीन
मनःपूर्वक धन्यवाद !!
मी म्हटले "...मग एक गझल दे!"
मी म्हटले "...मग एक गझल दे!"
जीवन पुन्हा म्हणाले..."नाही!"
यातला 'मग' आणि 'पुनः' हे शब्द खूप सांगणारे.इतर बरेच काही हिरावून घेतलेस, तर मग निदान एक गझल दे..इथे 'एक' हे संख्येने एका गझलेपेक्षा 'गझलेचे आयुष्यात असणे' अशा अर्थाचे सूचन करते असे मला वाटले.
आणि ते खोडसाळ जीवन एवढे एक समाधानही द्यायला तयार नाही..
हं. हे कविचे खासच दु:ख. पोचले.
आजच्या 'मंडई'मध्ये ते अॅब्सर्ड स्वरूपात आलेय..
पु.ले.शु...
धन्यवाद भारतीताई अगदी सहीसही
धन्यवाद भारतीताई अगदी सहीसही ओळखलत .............
असो अॅब्सर्ड म्हणजे काय नेमके .............सान्गाल का
आणि हो मी पुण्याचा नाहीय मी पंढरपूरचाय.............. मागच्या वेळी 'तुम्ही पुणेकर.... अमुक तमुक' असा काहीसा प्रतिसाद विचारपूस मधे देवून तुम्ही बरोबर टाळलत ..............
असो प्रतिसादाची वाट पाहीन ...............नेहमीप्रमणे!!:)
पुनश्च धन्यवाद