उत्साहामागचा पश्चात्ताप..

Submitted by रसप on 12 July, 2012 - 01:47

खूप बोलायच्या नादात खूप बोलून गेलो
अभिप्रेत केलेल्या भावनांनाही शब्दात तोलून गेलो
आता वाटतंय की..
जरा अजून धीर धरला असता
तुझ्या मनाचा अंदाज घेतला असता
तुझ्याशी बोलायच्या आधी
स्वत:शीच बोललो असतो
मनाच्या कप्प्यांमध्ये
जरासा चाचपडलो असतो

पण नाही...

आई नेहमी म्हणायची,
किती उतावळेपणा करतोस..?
तोच स्वभाव नडला..

मी कोसळत राहिलो
बेबंद धबधब्यासारखा
आणि तुझ्या कातळात एक थेंबही जिरला नाही
मी वाहून गेलो, अजूनही वाहतोय
पण ह्या उत्साहामागचा पश्चात्ताप
कुणालाच कळला नाही...

....रसप....
१२ जुलै २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_12.html

गुलमोहर: 

मी कोसळत राहिलो
बेबंद धबधब्यासारखा
आणि तुझ्या कातळात एक थेंबही जिरला नाही >>>> वा.... व्यथा सुंदर उमटलीये......

खूप खूप सुंदर.......... Happy

मी कोसळत राहिलो
बेबंद धबधब्यासारखा
आणि तुझ्या कातळात एक थेंबही जिरला नाही
मी वाहून गेलो, अजूनही वाहतोय
पण ह्या उत्साहामागचा पश्चात्ताप
कुणालाच कळला नाही...

हे सहीच, आवडले ....... Happy