जून २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

Submitted by Admin-team on 11 July, 2012 - 22:39

जून २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

p-18080.jpgपक्षांचे स्थलांतर - डॉ. सतीश पांडे. पक्षी स्थलांतर का करतात, त्यांच्या स्थलांतराचे काही नियमित प्रकार आहेत का, स्थलांतरासाठी त्यांना काही पूर्वतयारी करावी लागते का, प्रत्यक्ष स्थलांतर करताना प्रवास करण्यासाठी पक्षी कोणती साधने वापरतात, मार्गक्रमण करताना दिशादर्शन कसे करतात, उडताना काही विशिष्ट मार्ग वापरतात का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी अवश्य वाचावे असे पुस्तक.

p-18089.jpg राडा - भाऊ पाध्ये. 'राडा' आपल्या राजधानीतल्या महानगरीय औद्योगिक जगात नैसगिर्कता हरवून बसलेल्या तरुण माणसाची कादंबरी आहे.

p-18086.jpg महाराष्ट्र: एका संकल्पनेचा मागोवा - माधव दातार. महाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य... व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे पुरोगामी प्रतिमा मिरवणारे.
या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना. इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी
बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... 'महाराष्ट्रधर्म' ही तिची उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली.

p-18059.jpg साप - निलीमकुमार खैरे. विख्यात सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे गेली चार दशकांहून अधिक काळ सर्प, प्राणिसृष्टी आणि पर्यावरण या क्षेत्रांत कार्यरत आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्याकडे आढळणार्‍या ५७ सापांची माहिती रंगीत फोटोंसह दिली आहे. याबरोबर, सर्प व सर्पदंश कसे टाळावेत, विषारी सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार अशी बरीच माहिती यात मिळते.
उत्कृष्ट फोटो व सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहिती यामुळे हे पुस्तक शेतकरी, बागाईतदार, रानावनात फिरणारे ट्रेकर्स यांच्यापासून ते डॉक्टर, या विषयाचे अभ्यासक या सगळ्यांना उपयोगी आहे.


p-18077.jpg
अक्षरशिल्पे भाग १ - आनंद अरुण हातवळणे ,विनया अरुण हातवळणे. या मालिकेचे भाग २ आणि ३ देखील खरेदीवर उपलब्ध आहेत.


p-18076.jpg
अखंड भारत का नाकारला? - शेषराव मोरे. भावनेच्या आहारी न जाता आता तरी आपण फाळणीकडे वस्तुनिष्ठपणे बघणार आहोत का? फाळणीचे मूलकारण कोणते? फाळणीसाठी काँग्रेसला व गांधीजींना 'जबाबदार'
धरायचे की त्यांना फाळणीचे 'श्रेय' द्यायचे? जिनांना फाळणी हवी होती की फाळणीच्या बागुलबुवाआड त्यांचा दुसरा काही डाव होता? अशा अनेक प्रश्नांचा निःपक्ष शोध घेणारा आणि फाळणीकडे पाहण्याच्या परंपरागत दृष्टिकोनाला कलाटणी देणारा ग्रंथ. प्रकाशन - २५ ऑगस्ट २०१२.

p-18050.jpg कथा खगोलशास्त्राची - उदय पाटील, अनुवादक: सुनीता खरे. खगोलशास्त्र हा विषय खूपच विस्तृत आहे. या क्षेत्रातले आपले ज्ञान काही एका रात्रीत मिळवलेले नाही, तर ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचे फलित आहे. हा व्यापक विषय उदय पाटील यांनी या पुस्तकात मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. तर सुनीता खरे यांनी सहजसोप्या शैलीत त्याचा अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे खगोलशास्त्राची माहिती देणारी चित्रकथा नसून त्याची उत्क्रांती गोष्टीरूपात सांगण्याचा प्रयत्न आहे. जिज्ञासू तसेच या विषयात रस असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

p-18062.jpg आजी आजोबांची पत्रे - संपादन: सुरेखा पाणंदीकर. आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांशी खास नाते असते. टेलिफोन, मोबाइल आणि ई-मेल यांसारख्या संपर्क साधनांच्या जमान्यात पत्रसंस्कृती विरळा होत चालली आहे. मराठी साहित्यात पत्रांच्या संकलनाची अनेक पुस्तके आहेत. प्रामुख्याने ती मोठ्यांसाठी असल्याने खास लहान मुलांसाठी हे संकलित पुस्तक करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी नातवंडांना लिहिलेली पत्र असल्याने मुलांसाठी उद्वोधक आहेत.


p-18084.jpg
परिक्रमा नर्मदेची - नारायण आहिरे. नारायण आहिरे यांच्या मनात बालपणीच 'नर्मदा परिक्रमे'बद्दल कुतूहल जागं झालं,
या कुतूहलानं हळूहळू ध्यासच घेतला, नर्मदा परिक्रमा झालीच पाहिजे. प्रत्यक्षात मात्र त्यांनी साठीनंतर परिक्रमा केली. त्यांच्या दृष्टीनं, प्राचीन काळी जिच्या किना-यावर सतत यज्ञयागाची धूम्रवलयं उठत होती,ती नर्मदा अगदी पवित्र नदी आहे. तिच्या परिसरात मोठमोठी राज्यं होऊन गेली. कवी-तपस्वी,योगी-त्यागी-त्यागी-भोगी नर्मदेच्या काठी वास्तव्याला होते. नर्मदा परिक्रमा म्हणजे सुखद आनंदयात्रा आहे, पवित्र तीर्थयात्रा आहे आणि कसोटी पाहणारी साहसयात्रा आहे. या परिक्रमेतले अनुभव इतरांना कथन करण्याच्या ओढीने हे लेखन केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users