मायबोली व्यवस्थापन आणि प्रशासन

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीचा व्याप जसा वाढतो आहे तशी मायबोली व्यवस्थापनाची कामेही वाढत आहेत. यामुळेच मायबोली व्यवस्थापन टीम आणि प्रशासन टीम या दोन्ही भूमिका वेगळ्या ठेवण्याची आणि त्यांच्या जबाबदार्‍या स्पष्ट करण्याची गरज आहे.

मायबोली या संस्थेचा कार्यभाग संभाळणं, संस्थेची उद्दीष्टे साकार करणं हे काम व्यवस्थापन टीम कडे आहे. सध्या अजय गल्लेवाले, समीर सरवटे, दिपक ठाकरे आणि चिन्मय दामले (१ ऑगस्टपासून) या टीममधे आहेत. संस्थेच्या गरजेनुसार या टीममधे वेळोवेळी योग्य ते बदल केले जातील, नवीन व्यक्तीही त्यात सामील होतील. या व्यक्ती आपआपल्या विषयात/कामात असलेल्या त्यांच्या कौशल्याचा मायबोलीला उपयोग व्हावा म्हणून व्यवस्थापन टीमचा भाग असतील.

बहुसंख्य मायबोलीकरांना परिचीत असलेला मायबोलीचा भाग (जिथे आपण सगळे लिहीतो) याची व्यवस्था मायबोलीची प्रशासन टीम करते. सध्या अजय गल्लेवाले आणि समीर सरवटे या टीममधे आहेत. या टीमला मायबोलीवर सर्वसंचार करायचा, कुठलाही मजकूर बदलण्याचा, किंवा गरज पडल्यास काही व्यक्तींना रोखण्याचा तांत्रिक अधिकार आहे. ही एक खूप मोठी जबाबदारी आणि विश्वास आहे याची आम्हाला जाणीव आहे. या टीममधे काम करण्यासाठी एका वेगळ्याच कौशल्याची गरज असते आणि ही जबाबदारी आम्ही अतिशय गांभीर्याने घेत असतो, घेत राहू.

या दोन्ही भूमिका स्पष्ट करण्याचं कारण की व्यवस्थापनात नवीन व्यक्ती आल्या की त्या आपोआप प्रशासन टीमचा भाग होतील किंवा प्रशासन टीममधे नव्या व्यक्ती आल्या की त्या व्यवस्थापन टीमचा भाग होतील असे नाही. पण त्याचबरोबर प्रशासनासाठी योग्य कौशल्ये असलेली व्यक्ती मिळेपर्यंत, बाकीच्या मायबोली या संस्थेचा कार्यभाग थांबून राहण्याचीही गरज नाही.

मायबोली प्रशासनावर आणि व्यवस्थापनावर तुम्ही दाखवलेला विश्वास खूप मोलाचा आहे आणि म्हणूनच हा पारदर्शकपणा दाखवणं आम्हाला गरजेचं वाटलं.

विषय: 
प्रकार: 

Happy

 

ओक्के, द्याट्स गुड! Happy
पण "मॉडरेटर्सची" अनुपस्थिती खूपच जाणवते. Happy
[कशाला, का म्हणुन काय विचारता? अहो त्यान्च्या नावाने शन्ख कर्ता येत नाही म्हणून जाणवते हो अनुपस्थिती Wink ]