परी

Submitted by निलेश बामणे on 10 July, 2012 - 04:39

परी

तिच सुंदर दिसण हे एकच कारण

मी तिच्या प्रेमात पडायला....

माझ कुरूप दिसण हे एकच कारण

तिन मला रोज टाळायला...

सौंदर्य सोडल तर तिच्याकडे काहीच नव्ह्त

मी तिच्या प्रेमात पडायला...

पण! माझ्याकडे सारच जास्तच

होत ती मला टाळायला....

ती सुंदर पण ! चारचौघींसारखीच

एक होती म्हणायला...

मी कुरूप जरी असलो तरी आवडायचो

सर्वांना आपला म्हणायला...

मी वेडापिसा व्हायचो फक्त

एकदा तिला पहायला...

ती मात्र रोज नवीन बहाणे

शोधायची मला टाळायला...

शेवठी हिंमत नाही उरली

तिच्या मागे धावायला...

तेंव्हा ती लागली रोज मला

तिचा चेहरा दाखवून झुरवायला...

तिच्यापेक्षाही एक सुंदर परी

लागली माझ्याशी बोलायला...

मग ! काय ? एक क्षणही नाही

लागला मला तिला विसरायला...

कवी-निलेश बामणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: