' पाऊस गाणे '

Submitted by सुधाकर.. on 9 July, 2012 - 12:39

का पाऊस वेडा गातो
दु:खाचे रिमझिम गाणे
कि मजला ए॓कू येते
ते गीत अनामिक मोने.

सजनीच्या कंठ सुरांचे
गुंफिले भाव तराणे
आभाळ आसवांसम ते
निळाईतूनी झरणे.

थेंबात गोठली येथे
मेघांची हुरहूर सारी
का रडते आभाळ्माया
माझ्याच येऊनी दारी?

छेडीत येई वारा
गवताच्या हिरव्या तारा
शोधीत मानसीचा
व्याकूळला किणारा.

भिजताना चिंब तरू हे
का झडती पानोंपानी?
रिघती मनात माझ्या
का हुरहूर पाऊस गाणी?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

-

श्री. प्रमोद देव आपला हा प्रयत्न आवडला खरा परंतु तितकाच क्लेशदायकही वटला कारण कोणतीही पुर्व कल्पना न देता आपण माझ्या कवितेचे ऑडीयो गीतात रुपांतर केलेच कसे?

ऑर्फियस,मी व्यावसायिक नव्हे तर हौशी माणूस आहे...तेव्हा अजिबात चिंता करू नये अशी मी विनंती करतो...
हवं असल्यास इथे भेट द्या आणि पाहा... http://majhigani.blogspot.in/
तरीही आपल्याला पूर्वसूचना न देता मी चाल दिली आणि इथे चिकटवली ह्यासाठी मन:पूर्वक दिलगीरी व्यक्त करतो आहे...आपली इच्छाच असेल तर जालावरून आणि अगदी माझ्या हार्डडिस्कमधूनही मी ती चाल लगेच उडवून टाकेन....आपला निर्णय मात्र जरूर कळवा.

जाता जाता....इथेच आता जाहीरपणे सगळ्यांनाच सांगतो...आजवर मी जे काही केलं ते केवळ हौस म्हणून आणि सदिच्छा म्हणूनच..पण ह्यापुढे कुणीही रीतसर विनंती केल्याशिवाय मी कोणत्याही/कोणाच्याही कवितेला चाल लावण्याचा उपद्व्याप करणार नाही.

श्री. प्रमोद देव..... आपण आपल्या हौसे खातर कवितेला लावलेल्या चालीवर माझा मुळीच राग नाही, उलट ती तर मला अधीक आवडली. परंतू आपण माझ्यासाठी नविन आहात त्यामुळे हे करण्यापुर्वी मला आपल्या कडून दोन शब्दाची पुर्व सुचना तरी मिळायला हवी होती इतकेच. तसे हे गाणे म्हणजे तुमचे शब्द- स्वरांवरचे प्रेम आहे ते डिलिट करू नये.

होहो मलाही तेच म्हणायचे आहे ऑर्फी.........

प्रमोद जी: .आपण आमच्या ऑर्फीच्या रचनेला इतकी छान चाल लावलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत

ऑर्फियस, आपल्या आक्रमक वागणुकीमुळे मी अत्यंत दुखावलो गेलो आहे आणि म्हणूनच त्या चालीची फाईल मी माझ्या हार्डडिस्क आणि जालावरूनही उडवून टाकलेली आहे.

आपण आता जरी उदारपणाचा आव आणला असलात तरी माझ्याबद्दल कुशंका घेऊन मायबोली प्रशासनाकडे तक्रार करण्यासंबंधी इतरत्र विचारणा करत फिरलात हे मला समजले आहे.. त्यावरून हाच निष्कर्ष निघतो की आपण कमालीचे आढ्य आणि दुसर्‍याबद्दल सदैव अविश्वास बाळगणारे आहात आणि अशा स्वभावाच्या व्यक्तीशी मी कधीच जूळवून घेऊ शकत नाही तस्मात मी वर सांगितलेली कृती केलेली आहे.

आपल्या आततायी कृतीआधी किमान माझ्या विपूत दिलेली माझी माहिती, माझ्या जालनिश्यांचे दुवे आणि त्या दुव्यावरून जाऊन प्रत्यक्ष जालनिशी पाहिली असती तर मी कोण आहे, माझा हेतू काय आहे इत्यादि गोष्टी आपल्याला कुणालाही न विचारता कळल्या असत्या..किमान मी तुमच्यासारखा इतरांपासून आपली ओळख लपवणारा नाही हे तरी नक्कीच कळले असते. Wink
असो...माझ्याकडून इतकेच आणि हे शेवटचेच.

ऑर्फियस, आपणाला देवकाकांविषयी शंका होती तर तुम्ही त्यांना विचारायला हवं होतं विपू मधून की आपण व्यावसायिक संगीतकार आहात का वगैरे. मग त्यांनी उत्तर दिलंच असतं की ते हौशी आहेत आणि जे काही असेल ते. मग हा कडवटपणा निर्माणच झाला नसता. देवकाका मायबोलीवरच नव्हे तर इतरही संकेतस्थळांवरील (आणि वास्तविक जीवनातही) अत्यंत जेष्ठ सदस्य असून त्यांना सगळीकडे मान आहे हे तुम्हाला माहित नसल्यास सांगतो.

अवांतरः (ऑर्फियस हे तुम्हाला नव्हे): हल्ली जेष्ठ नागरिकांचा मान न ठेवण्याची फॅशन बोकाळली आहे. मायबोलीवर हा प्रकार देवकाकांच्या बाबतीत पहिल्यांदाच घडलेला नाही. तरी संबंधितांनी योग्य बोध घ्यावा.

देव काका,

तसं पाहाता माझी-तुमची काहीच ओळख नाही. पण, तुमचा हेतु खूपच शुद्ध आहे, हे कळून येते आहे.

जे काही झाले, त्याला एक गैरसमज म्हणून समजून आपण कुठलीही नाराजी मनात ठेवू नये; अशी एक नम्र विनंती करतो. आपण हौस म्हणून का होईना, जे करत आहात ते फार कमी लोक करू शकतात.

धन्यवाद.