झोपलेला देश आता.....

Submitted by वैवकु on 9 July, 2012 - 06:28

झोपलेला देश आता जागवाया पाहिजे
माजले हे रान आता पेटवाया पाहिजे

नेहरू-गांधी नको आता भगतसिंग्-बोस व्हा
राष्ट्र्भक्तीच्या दुधावर आत्म्यांना पोसवा
एकही बलिदान ते वाया न जाया पाहिजे

लाभले स्वातंत्र्य ; नाही लाभली सत्ता खरी
लोकशाही करत आहे 'सेवकांची' चाकरी
काय त्यांची लायकी त्यांना कळाया पाहिजे

आर भ्रष्टाचार आहे तोच त्यांच्या पारही
चार पैसे खायला विकतील ते "आई" सही
भाडखावी ही 'व्यवस्था' नागवाया पाहिजे

हे नका आता विचारू हे करू की ते करू
फक्त एकच ध्यास घेवू राष्ट्र पुनः उद्धरू
काज काहीही करा .. पण काम व्हाया पाहिजे !!!

झोपलेला देश आता जागवाया पाहिजे ...........
माजले हे रान आता पेटवाया पाहिजे ...............!!!!!

गुलमोहर: 

चीड व्यक्त झालेलीच आहे

मला या ओळी अधिक प्रभावी वाटल्या

<<<भाडखावी ही 'व्यवस्था' नागवाया पाहिजे

<<<हे नका आता विचारू हे करू की ते करू

धन्यवाद

भावना छान व्यक्त झाल्या आहेत.

>>चार पैसे खायला विकतील ते "आई" सही<<

नव्हे, ते आधीच झाले असावे असा संशय का येऊ नये? स्वीस बँकेत ठेवलेले भारतीयांचे पैसे आणण्यात चाललेली दिरंगाई पाहाता , अ‍ॅग्रिमेंटच्या आधीचा तो कॅश अ‍ॅडव्हान्स नसेल कशावरून?

वैभवजी,
निखार्‍यांवर राख साठली आहे,तिला फुंकर मारून अग्नी चेतवायचं काम आता शाहीराना(कविना) कराव लागणार आहे हे नक्की.
खुप आवडली,पुन्हा-पुन्हा वाचली.

बेफीजी ,रणजित, दा.सु. ,वैशालीताई, विभाग्रज, किरण, ऑर्फी ,डॉ.साहेब, शामजी

सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार

ज्वलंत !

हे नका आता विचारू हे करू की ते करू
फक्त एकच ध्यास घेवू राष्ट्र पुनः उद्धरू
काज काहीही करा .. पण काम व्हाया पाहिजे !!!

आपणही जागं होऊन हे करायला हवय!

अगदी वीररसातील कविता. खूप आवडली.

काव्य हे केवळ करमणूकीचे माध्यम नसून देश आणि समाज घडविणारी शक्ती असते.
आपल्या या कवितेने दिलासा दिला आहे.