आलो इथे कशाला माझे मला कळेना...

Submitted by इस्रो on 7 July, 2012 - 10:29

ढोंगी, लबाड भाषा त्यांची मला जमेना
आलो इथे कशाला माझे मला कळेना

माझे नि जीवनाचे पटले कधीच नाही
जुळवून रोज घेणे त्याचे मला टळेना

दारु असो कि औषध सारेच भेसळीचे
कसदार, सकस, ताजे आता मला पचेना

नाना प्रकार येथे दिसतात माणसांचे
माणूसकी अता पण कोठे मला दिसेना

शिकतो तुझ्यामुळे मी गझलेस 'मायबोली'
गझलेशिवाय आता काही मला सुचेना

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०, ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

गुलमोहर: 

छान Happy

ढोंगी, लबाड भाषा त्यांची मला जमेना
आलो इथे कशाला माझे मला कळेना

माझे नि जीवनाचे पटले कधीच नाही>>>

मतला व ओळ आवडले

Happy