तू तुझ्या, मी माझिया नादात आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 7 July, 2012 - 07:59

गझल
तू तुझ्या, मी माझिया नादात आहे!
कोणते नाते तुझ्यामाझ्यात आहे?

कोण गाते? ते मला माहीत नाही....
एक गाणे माझिया श्वासात आहे!

वेदना जितकी तुझ्या विरहात होती;
वेदना तितकीच सहवासात आहे!

जाहली दु:खांसवे मैत्री जिवाची;
जीवना! मी आज आनंदात आहे!

का विटाळू तोंड मी वादात त्यांच्या?
राम कुठल्या, सांग वादंगात आहे?

आजची तिन्हिसांज का वाटे निराळी?
कोणता संदेश सूर्यास्तात आहे?

वाकडे पाऊल ना पडणार माझे!
आज मी मझ्याच विश्वासात आहे!!

राहिले रोमांच अंगावर उभे का?
काय माझ्या नेमके मतल्यात आहे?

वाटते तो जिंकतो मैफल अखेरी;
जीत त्याची प्रथम आलापात आहे!

का उगा गझलेत गुंफू नाव माझे?
येथल्या प्रत्येक मी मिस-यात आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

लाजवाब सर.. अनेक शेरांमध्ये सहज आले Paradox अतिशय उस्फुर्त वटतात.

कोण गाते? ते मला माहीत नाही....
एक गाणे माझिया श्वासात आहे!

का विटाळू तोंड मी वादात त्यांच्या?
राम कुठल्या, सांग वादंगात आहे?

आजची तिन्हिसांज का वाटे निराळी?
कोणता संदेश सूर्यास्तात आहे?

.........................................................

का उगा गझलेत गुंफू नाव माझे?
येथल्या प्रत्येक मी मिस-यात आहे!
...... हा शेवट अतिशय समर्पक आणि छानच आहे.

तू तुझ्या, मी माझिया नादात आहे!
कोणते नाते तुझ्यामाझ्यात आहे?

माझ्या मते असा असायला हवा हा शेर ...........(वै म)

ती तिच्या मी माझिया नादात आहे
कोणते नाते तिच्या-माझ्यात आहे?

मी माझिया नादात आहे...... हे बरोबर वाटत आहे ऐकायला
तू तुझ्या नादात आहे ....... आहेस असे हवे ना ?

आता ती तिच्या नादात आहे....... हे कसे खट्कत नाहीय होय ना
आता यामुळे आधी तू तुझ्या ..(आहेस) मी माझिया नादात आहे असे म्हनताना आहेस हे अख्खेच्याअख्खे अव्यक्त राहत होते
तसे 'ती तिच्या .... ' म्हणताना नाही होत. ? 'आहे' हे क्रियापद एकदाच वापरून दोन्दा वापरल्याचा फील देतय होय कि नै !!

म्हणून ..बाकी काही नाही ......!!!

आजची तिन्हिसांज का वाटे निराळी?
कोणता संदेश सूर्यास्तात आहे? >>> वाह!

वाटते तो जिंकतो मैफल अखेरी;
जीत त्याची प्रथम आलापात आहे! >> क्या बात है!

खूप आवडली गझल. धन्यवाद सर! Happy

वेदना जितकी तुझ्या विरहात होती;
वेदना तितकीच सहवासात आहे!

जाहली दु:खांसवे मैत्री जिवाची;
जीवना! मी आज आनंदात आहे!<<< छान शेर आहेत

राहिले रोमांच अंगावर उभे का?
काय माझ्या नेमके मतल्यात आहे?

का उगा गझलेत गुंफू नाव माझे?
येथल्या प्रत्येक मी मिस-यात आहे!<<<

निफाडकरांसारखे शेर वाटले