अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे....

Submitted by मयुरेश साने on 6 July, 2012 - 14:11

मरण माझेच आयुष्यात माझ्या रोज डोकावे
अशी ही वेळ येते वाटते की बस तुझे व्हावे

सुखे असतील जर कोठे मला भेटू नका आता
कशाला मी तिचे व्हावे व्यथेशी गोड बोलावे

असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे

उशाशी स्वप्न माझे घेउनी निजतेस तू रात्री
अशी स्वप्ने मला पडती अता माझे कसे व्हावे

मला तू भेट आणी एकदा दे हासुनी टाळी
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे

...मयुरेश साने

गुलमोहर: 

असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे

उशाशी स्वप्न माझे घेउनी निजतेस तू रात्री
अशी स्वप्ने मला पडती आता माझे कसे व्हावे

>>>>

हे दोन आवडले Happy

असे भलतेच काही चेहरे माझ्यात सापडले
खरा माझ्यातला मी कोण आता काय सांगावे

मला तू भेट आणी एकदा दे हासुनी टाळी
मनी जे दाटते ते हुंदक्यांनी मोकळे गावे>>>

खयाल आवडले

सगळ्यांचे आभार

आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥

माझाही घोळ होतो कधी कधी,,,पण मी या तुकारामांच्या अभंगावरुन ठरवलं की आता बरोबर आहे

मी या तुकारामांच्या अभंगावरुन ठरवलं की आता बरोबर आहे >>> आताही बरोबरच आहे पण येथे वृत्ताची मागणी "अता" अशीच आहे... रणजीतला हेच सांगायचे असावे. Happy शाम