अभियांत्रिकी प्रवेशांमधे आय टी शाखेला कमी मागणी का आहे? तुमचे मत..

Submitted by mansmi18 on 6 July, 2012 - 01:22

नमस्कार,

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रवेशात गेल्या वर्षीचे क्ट ऑफ पाहता आय टी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) शाखेचे कट ऑफ्स खुपच कमी आहेत. काही विशेष कारण आहे का यामागे? कृपया या प्रवेश प्रक्रियेतुन गेलेल्यानी अनुभव्/मते लिहाल का?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षीही जेवढ्या जागा होत्या त्यापेक्षा कमी अर्ज आले होते. मला वाटते १.२५ लाख जागा होत्या आणि जवळपास लाखभर अर्ज आले होते. यावर्षीही उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आल्याचे वाचलेय. मुळात अर्जच कमी असतील तर कट ऑफ वर परिणाम होणारच.

फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्यापेक्षा आजवर न धुंडाळलेली फिल्ड्स निवडायची इच्छा मुलांना होत असेल तर चांगलेच आहे की.

IT पेक्षा computer engg जास्त परिपुर्ण शाखा मानण्यात येते म्हणुन.COM EnG चांगला डिमांड आहे अजुन.

कारण mechanical, elect etc. लोकांना त्यांच्या क्षेत्रात आणि आय टी मधे पण नोकरी मिळते. पण ह्याच्या उलट होत नाही. त्यामुळे आय टी ला एवढी मागणी नसावी.

मी सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतूनच जात आहे. ही अत्यंत किचकट व वेळखाऊ प्रक्रिया ९ जून पासून सुरू झाली आणि ती अंदाजे ३१ ऑगस्ट पर्यंत चालेल. वेळ झाला की यावर सविस्तर लिहीन.

आमच्या वेळेस आयटी शाखा नव्याने सुरु झाली होती. त्यांना core विषय कमी अन जावा, सी++, युनिक्स, कोबोल वगैरे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस वर च भर होता. ह्याउलट कम्प्यु.इंजि. ला काही इलेक्ट्रॉनिक्स चे विषय आणि इतर सगळे core विषय होते. उदा. Compilers, Computer Architecture and Oraganization, Theory of Computation, Design Principles of Programming Languages etc. याशिवाय Networks, O.S., Software Engineering वगैरे दोन्हीकडे होते.
त्यामुळे लोक आयटी शाखा प्रेफर करत नसत. आताची स्थिती माहीत नाही. सिलॅबस बघितले तर कळेल. ते युनी. प्रमाणे बदलू शकते.

नताशा तू म्हणतेस तेच कारण आहे. फक्त लोक शाखा प्रेफर करण्यापेक्षा एम्प्लॉयर्स कोर सब्जेक्टसना जास्त वॅल्यु करतात आणि कँपस मधल्या बल्क सिलेक्शन नंबर्स वरून पुढे त्या शाखेचे कट ऑफ्स ठरत जातात. (हे आक्खं वाक्य इंग्लिश मधेच झालंय फक्त लिपी देवनागरी आहे.)
आपल्याकडे स्वतः समजून उमजून अभ्यासक्रम निवडण्याची पद्धत (आणि कुवत) कमीच आहे.

संघमित्रा, नताशा

मी काँप्युटर्स आणि आय टी दोन्हीचे सीलॅबस पाहिले..५/६ विषय वगळता सगळा सारखा सीलॅबस आहे. आणि कंपन्या सुद्धा इन्फोसिस, विप्रो, सिंटेल इ. कँपस ला असतात. त्या काय आय टी ग्रॅजुएट्स सोडुन इतर एलेक्ट्रॉनिक्स /ई अँड टीसी ची मुले घ्यायला लागल्यात का सध्या?
आणि कट ऑफ्स मधे खुपच अंतर आहे उदा. विवेकानंदला कॉप्युटर चा कट ऑफ होता (२०११) ला १५० आणि आय टी चा होता १२५.

आमच्या एका नातेवाईकांचा मुलगा सध्या या प्रक्रियेतुन जात आहे. मी त्याला म्हणालोय की आय टी सुद्धा चांगली आहे (पुढे नोकरीच्या दृष्टीने) पण त्याचे कट ऑफ्स लो आहेत त्यामुळे त्याना आय टी बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्या ऐवजी ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा इ अँड टीसी किंवा इलेक्ट्रीकल प्रेफर करत आहेत.
कळत नाही आहे कि लोकांचे "रॅशनाल" काय आहे आयटी बद्दल..

धन्यवाद.

मनस्मी , हे पार पुर्वीपासून चालत आहे. मी स्वतः असाच विचार करुन IT , computer science ची Govt College ची सिट सोडून दिली. का तर dual option पाहिजेत म्हणुन. electronics घेतल कि कंप्युटर आणि ele. दोन्ही कडे नोकरी मिळू शकेल या उद्देश्याने.
IMO , अत्यंत मोठी चूक आयुष्यातली. IT घेतल असत तर डायरेक्ट जॉब मिळाला असता. ele. घेतल्यामुळ सी डॅक टाईपचा कोर्स करावा लागला. ele. field मध्ये कधी करिअर करायचच नव्हत तर तो ऑप्शन तरी का ठेवलेला मी कुणास ठाउक. Uhoh

जर का , भाच्याला IT मध्येच करिअर करायच असेल तर ele . खरच घ्यायची गरज नाही. IT चा सिलॅबस मला माहिती नाही. पण तो जर s/w dev. वर आधारित असेल तर मी तरी तिथेच गेले असते. किंवा मग computer science घेतल असत. पण ते ही याकरिता कि जास्त मान्यता आहे म्हणुन. (उदा. पुढे MS करताना वगैरे)

हे फक्त माझ कस चुकलं विचार करायला ते सांगण्यासाठी लिहिल. शुभेच्छा. Happy

>>> पण त्याचे कट ऑफ्स लो आहेत त्यामुळे त्याना आय टी बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्या ऐवजी ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा इ अँड टीसी किंवा इलेक्ट्रीकल प्रेफर करत आहेत.

गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल 'मेकॅनिकल' अभियांत्रिकी कडे आहे, तर सर्वात कमी कल 'प्रॉडक्शन' व 'मेटलर्जी' कडे आहे. 'मेकॅनिकल' खालोखाल 'कॉम्प्युटर इंजिनिअरिंग' व 'ईलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम' कडे कल आहे. 'सिव्हिल' व 'आयटी' कडे त्यापेक्षा कमी म्हणजे मध्यम/कमी कल आहे.

त्यामुळे सीईटीच्या मार्कांचा कटऑफ 'मेकॅनिकल' साठी सर्वात जास्त तर 'सिव्हिल', 'आयटी', 'प्रॉडक्शन' व 'मेटलर्जी' साठी सर्वात कमी आहे.

इ अँड टीसी चा अभ्यासक्रम खूप अवघड आहे. त्यामुळे या शाखेत प्रथम वर्ग मिळविणे अवघड आहे. कॅम्पस मुलाखती घेताना बहुतक कंपन्या प्रथम वर्ग असलेल्या मुलांचाच विचार करतात. त्यामुळे या शाखेतली मुले हुशार असूनही गुण कमी असल्याने (कारण अभ्यासक्रम अवघड असतो), त्यांचा फारसा विचार होत नाही. त्यामुळे ही शाखा घेताना खूपच विचार घेऊन शाखेची आवड व भरपूर अभ्यासाची तयारी असेल तरच इकडे वळावे.

सीमा,

अजुनही लोक कशाला डीमांड जास्त आहे त्याला जात आहेत काहीही विचार न करता. असो.

आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

रीस्क. उद्या जर IT jobs कमी झाले तर काही पर्याय असावा म्हणुन, पण असा विचार करणे योग्य नाही.