Submitted by सुधाकर.. on 5 July, 2012 - 10:34
जे व्हायचे ते घडून गेले
इथे पावसाळे रडून गेले.
कोण वाचतो शब्दास आता
ज्ञान ग्रंथात सडून गेले.
घातले दाणें जरी मुठीने
उपाशीच पक्षी उडून गेले.
माझी मी दिली कुर्हाड ज्यांना
माझ्याशीच ते लढून गेले.
रक्तावर पोसले तरु जरी
पानगळीत हे झडून गेले.
गर्दीत पाहीले सोयरे जे
नजरे समोरच दडून गेले.
किती सावरावं प्रत्यकाला?
आसवात गाव बुडून गेले.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लहान बहर सांभाळणे खूप अवघड
लहान बहर सांभाळणे खूप अवघड असते ऑर्फी.........
प्रयत्न बरा आहे हा
मात्रावृत्त सम्भवते १७ मात्रा प्रत्येक ओळीत............ हो ना ..?
पु ले शु