Submitted by सतीश देवपूरकर on 5 July, 2012 - 08:12
गझल
नाहीस वेचले तू, वेचेल अन्य कोणी!
मी एक फूल आहे, माळेल अन्य कोणी!!
दे राजरोस फाटा, वा टाक कोप-याला;
मथळ्यासमान मजला छापेल अन्य कोणी!
दगडावरील काळ्या, मी एक रेघ आहे!
माझीच री पुढेही.....ओढेल अन्य कोणी!!
तरळू नकोस देवू डोळ्यांत भाव माझे;
नसल्यावरी इथे मी, वाचेल अन्य कोणी!
हे फक्त एक पुस्तक नाही....असे स्वत: मी!
विसरू नकोस कोठे, चाळेल अन्य कोणी!!
वेळीच हृदय माझे ताब्यात घे तुझ्या तू;
समजायच्याच आधी, लाटेल अन्य कोणी!
तू खूप आवडीने लिहिलेस नाव माझे;
ते नाव ऎनवेळी वगळेल अन्य कोणी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
गुलमोहर:
शेअर करा
वेळीच हृदय माझे ताब्यात घे
वेळीच हृदय माझे ताब्यात घे तुझ्या तू;
समजायच्याच आधी, लाटेल अन्य कोणी!>>>
वा वा
मनापासून सान्गतो सर ; आपल्या
मनापासून सान्गतो सर ; आपल्या नेहमीच्या गझलेइतकी कामयाब नाही वाटत आहे ही गझल
नाहीच आवडली या वेळी ..............क्षमस्व
दे राजरोस फाटा, वा टाक
दे राजरोस फाटा, वा टाक कोप-याला;
मथळ्यासमान मजला छापेल अन्य कोणी! <<< व्वा >>>
वेळीच हृदय माझे ताब्यात घे तुझ्या तू;
समजायच्याच आधी, लाटेल अन्य कोणी! <<< खूप सुंदर...मस्त >>>
...खूप आवडली
छान.
छान.