गगनात वीज लकलकते, अन् तुझी आठवण येते!

Submitted by सतीश देवपूरकर on 4 July, 2012 - 11:41

गझल
गगनात वीज लकलकते, अन् तुझी आठवण येते!
सर वळवाची कोसळते, अन् तुझी आठवण येते!!

मृद्गंध नव्हे धरणीचा, हा गंध तुझ्या पदराचा!
झुळकीने मन कळवळते, अन् तुझी आठवण येते!!

लवलवणारी ही फांदी, की, रुळणारी ही वेणी?
एखादे फूल निखळते, अन् तुझी आठवण येते!

बिलगली वेल भिजलेली, की, तूच उभी ओलेती?
गात्रात शिरशिरी भरते, अन् तुझी आठवण येते!!

सर अवचित जावी पडुनी, तारुण्य तसे ओसरते!
हुरहूर तेवढी उरते, अन् तुझी आठवण येते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

सर अवचित जावी पडुनी, तारुण्य तसे ओसरते!
हुरहूर तेवढी उरते, अन् तुझी आठवण येते!!>>> व्वा व्वा

इतर शेर मला चित्रदर्शी व रोमॅन्टीक वाटले. (रोमॅन्टीक शेर मराठीत कमी दिसतात असे काही तज्ञांचे म्हणणे आहे).

वैभवराव... गझल बाबत गंभीर व्हावे आणि लवकर भानावर यावे अशी विठ्ठ्ल चरणी याचना करतो...

काय ते समजा.

शामराव, सहमत आहे

वैवकु,

इतरांच्या गझलेवरील प्रतिसाद व त्यातील बोचरेपणा जरा कमी करा आता, असे आपले सांगत आहे.

तीच एनर्जी गझला करण्यासाठी का वापरत नाही आहात?

तुमच्याकडे उत्तम खयाल आहेत हे आत्तापर्यंतच्या गझलांवरून दिसतच आहे.