तुळस मंजिरी..

Submitted by के अंजली on 4 July, 2012 - 04:01

विठो तुझ्या राऊळा
फुले चैतन्याचा मळा
असा आनंद सोहळा..
विरो ऐहिकाच्या कळा..

फिटे मी तू पण सारे
वाहे आत्मानंदी वारे
खुली इश्वराची दारे
आनंदाला पार नाही..

दिठी अभंगात दंग
घडो सज्जनांचा संग
उभे आनंद तरंग
जन्म जन्माच्या प्रवाही..

माझा मीच निराकार
नामाचा या साहुकार
ब्रम्हचैतन्य साकार
विठो विठो विठो पायी..

डोळा दाटली पंढरी
देह नाम्याची पायरी
मन झाले वृंदावन
आत्मा तुळस मजिंरी...

गुलमोहर: 

सहज शब्दात भक्तिभाव छान व्यक्त झालाय.

"माझा .......विठो पायी..
"डोळा दाटली ..... तुळस मजिंरी..."
ही दोन कडवी अधिक आवडली.

अरेच्या, इतकी छान रचना मी कशी काय पाहिली नाही ??

पहिल्या ओळीपासून अखेरपर्यंत जमलेली कविता - वाचतच रहावी अशी...