मी येण्या आधी येथे......!

Submitted by सुधाकर.. on 3 July, 2012 - 12:59

मी येण्या आधी येथे, मला कधी ना कळले होते
प्रत्यकाचे हात इथे पापधुळीने मळले होते.

शाळेत शिकलो एक अन् जगी पाहीले दुजेच काही
अज्ञानाचेच दळण येथे सज्ञानाने दळले होते.

नशा, वासना, लाचारी पैशाचे हे मंगळ येथे
चंगळ पाहुन मन माझे, कधी जराशी चळले होते.

सभ्यतेवर थुंकूण जेंव्हा जुगार्‍याचा डाव मांडला,
मागुन आल्या शब्दांनीच मनास तेंव्हा छळले होते.

विसरुण या जगास आता स्वप्नात रमणे ठरले पण,
मनात माझ्या स्वप्नांचे गावच अवघे जळले होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुमचा फुगा (मला वाटल्याप्रमाणे) फुटणार आता:

<<<

शाळेत शिकलो एक अन् जगी पाहीले दुजेच काही
अज्ञानाचेच दळण येथे सज्ञानाने दळले होते.

नशा, वासना, लाचारी पैशाचे हे मंगळ येथे
चंगळ पाहुन मन माझे, कधी जराशी चळले होते.

सभ्यतेवर थुंकूण जेंव्हा जुगार्‍याचा डाव मांडला,
मागुन आल्या शब्दांनीच मनास तेंव्हा छळले होते.

विसरुण या जगास आता स्वप्नात रमणे ठरले पण,
मनात माझ्या स्वप्नांचे गावच अवघे जळले होते.

>>

तुम्ही काय करताय माहितीय का? पहिल्यांदा अशुद्ध गझल् रचायची, मग पब्लिकला फ्रंट फूट वर आणायचे. मग सहा महिन्यांनी एकदम एक जबरदस्त गझल टाकायची इत्यादी.

असे नका करू. मस्त गझलतंत्रात बसवा. तसे केलेत की मग तुम्ही मला 'तुम्ही नका म्हणू हो' असे म्हणणे बंद कराल.

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी आपल्या म्हणन्याप्रमाणे गझलेचे तंत्र अशुध्द आहे की......??????

कुणी शागीर्द मित्रांनो कुणी उस्ताद मित्रांनो>>>>>

लग्गेच कुणीतरी डॉक साहेबाना फोन करा रे प्लीज (मी करतोय लागतच नाहीय ) ; की तरहीसाठी मस्त झकास ओळ सापडलीय म्हणून .............

________________________-

(बेफीजी: हा शागीर्द शब्द तुम्हाला कसा सुचला हे मला समजले आहे आता पुण्यात आल्यावर पेनल्टी सोबत रॉयल्टी पण वसूल करावी म्हणतोय मी..........:G )