किती मानहानी गिळली, काय तुला सांगू?

Submitted by सतीश देवपूरकर on 3 July, 2012 - 12:19

गझल
किती मानहानी गिळली, काय तुला सांगू?
घरे काळजाला पडली! काय तुला सांगू?

रोष किती रस्त्यांचा मी ओढवून घेवू?
वाट घराचीही रुसली, काय तुला सांगू?

एकवेळ समजू शकतो साक्ष दुश्मनांची;
दोस्तमंडळीही फिरली, काय तुला सांगू?

दोनचार झाडांसाठी तुला रडू आले;
पुरी बाग माझी जळली, काय तुला सांगू?

कसे कोणजाणे गेले कुणाला न ऎकू;
तटातटा नाती तुटली, काय तुला सांगू?

फेडता न आली देणी मला जिंदगीची;
राखही चितेची विकली, काय तुला सांगू?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

फेडता न आली देणी मला जिंदगीची;
राखही चितेची विकली, काय तुला सांगू? ....देवपूरकर प्लिज आपला हा 'ही' चितेच्या नंतर ठेवा म्हणजे गझलेचा वरून खालपर्यंत आलेला नादभरी ठेका कुठेच अडवला जाणार नाही.

अतिशय छान गझल आहे.

रोष किती रस्त्यांचा मी ओढवून घेवू?
वाट घराचीही रुसली, काय तुला सांगू?>>> वा छान

एकवेळ समजू शकतो साक्ष दुश्मनांची;
दोस्तमंडळीही फिरली, काय तुला सांगू?> हम्म्म

दोनचार झाडांसाठी तुला रडू आले;
पुरी बाग माझी जळली, काय तुला सांगू?<<< पहिली ओळ व्व्वा

कसे कोणजाणे गेले कुणाला न ऎकू;
तटातटा नाती तुटली, काय तुला सांगू?>>> व्वा व्वा

फेडता न आली देणी मला जिंदगीची;
राखही चितेची विकली, काय तुला सांगू?>>>

अतिशय सुंदर शेवटचा शेर

प्रोफेसर साहेब, तुम्ही गझलेवर गद्य लिहिण्यापेक्षा गझलाच लिहीत राहा

उगाच आपले वाद घालायचे

शुभेच्छा

(तुमची ही गझल आणि माझ्या 'धाडस केले' वरचे गद्य हे मिसमॅच आहे)

आत्ता पुन्हा प्रयत्न केल्यावर नीट म्हणता आली

प्रोफेसर साहेब, गझलकार त्याच्या गझलेतून दिसतोच, आपली ही गझल आवडली आणि मी प्रामाणिक माणूस असल्याने ते स्पष्टपणे सांगितलेही

शुभेच्छा

किती मानहानी गिळली
घरे काळजाला पडली!

रोष किती रस्त्यांचा
वाट घराचीही रुसली

एकवेळ समजू शकतो
दोस्तमंडळीही फिरली

दोनचार झाडांसाठी
पुरी बाग माझी जळली

कसे कोणजाणे गेले
तटातटा नाती तुटली

फेडता न आली देणी
राखही चितेची विकली
...................................

अजून काय तुला सांगू
की गझल कशी वाटली .. Wink

शामराव ग्रेट आहात
_/\_

तुम्हाला या गझलेतली जादू बरोबर कळली..........
[..........माझा शेर वाया गेला बघा (:()
गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा ........... ]

असो ,
पर्यायी गझल अशीही असू शकते याचा साक्षात्कार झाला.....;)
पुन्हा एकदा दंडवत

_/\_

धन्यवाद

रोष किती रस्त्यांचा मी ओढवून घेवू?
वाट घराचीही रुसली, काय तुला सांगू?

कसे कोणजाणे गेले कुणाला न ऎकू;
तटातटा नाती तुटली, काय तुला सांगू?

फेडता न आली देणी मला जिंदगीची;
राखही चितेची विकली, काय तुला सांगू?

<<<< अप्रतिम शेर >>>

अफाट गझल ...आपणा काय सांगू?

बेफिकीरजी!
आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपला सल्ला मी तंतोतंत पाळेन!
माझ्या प्रदीर्घ प्रतिसादाने आपण दुखावले गेले आहात. त्या बद्दल क्षमस्व!
माझा हा प्रतिसाद delete करायचा असल्यास, तो कसा delete करायचा?
वाद, भूषणराव, मला देखिल नको आहेत!
माझी ही गझल व मी आपल्या गझलेला दिलेला गद्य प्रतिसाद मिसमॅच आहे...............कबूल!
अवांतर:
माझी ही गझल मात्रावृत्तातील आहे.
१४+१०=२४ अशी तिची लय आहे.
आपणास सूर्यनमस्कार घालायला लागल्याबद्दल पुन्हा क्षमस्व!
आपणातला प्रामाणिकपणा माझ्यातही येवो, अशी देवाकडे कळकळीची प्रार्थना करतो व थांबतो.
पुन्हा एकदा आपणास झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व!
राग नसावा.
..........प्रा.सतीश देवपूरकर

फेडता न आली देणी मला जिंदगीची;
राखही चितेची विकली, काय तुला सांगू?..
क्या बात है...