'तव जुना छंद हा घटनांनी नटण्याचा'..
क्रांती साडेकर यांनी आज ( २२-०३-२०१३) 'मराठी कविता समूह' मध्ये लिहिलेल्या अप्रतिम रसग्रहणासह ही कविता येथे पुनःप्रकाशित करत आहे.. आभार क्रांती, अशा रचनांना न्याय देणे कवितेवर निस्सीम प्रेम करण्यातूनच साध्य होऊ शकते..
सरकली मनातून पुनः कुणाची छाया
सरकली मनातून पुनः कुणाची छाया
सळसळल्या आशा मीच रुजवलेल्या या
मी द्विधा तरीही भग्न मंदिराजवळी
तनुची तमशिल्पित दीपमाळ पाजळली
खसफसे गवत वार्यात उडे पाचोळा
फिरफिरून प्राण पापणीत होती गोळा
..तो दूर निनादे सूर कुण्या पथिकाचा,
-'तव जुना छंद हा घटनांनी नटण्याचा..
तू विस्तारत जा हृदया-हृदयामधूनी
होऊ दे शांत अस्तित्वाचा जठराग्नि
जे घडले,घडते,घडणे याच्यापुढती
ते ओलांडून ने पैल ज्योत थरथरती..'
-शांतले जरासे वादळ श्वासांमधले
संतुलन आतले जुळून क्षणभर आले
लखलखले काही जाणिवेत मधुमधुर *
-माझ्यात संक्रमित विश्वगीतझंकार..
('मध्यान्ह' मधून- भारती बिर्जे डिग्गीकर )
क्रांती -'' अजाणता एखादी अनोळखी सावली अचानक मनात डोकावून जावी आणि आपणच रुजवलेल्या आशेच्या पानांची सळसळ व्हावी. कोणती नवी कल्पना, भावना तरळून गेली असेल मनात? नक्कीच काहीतरी हवंहवंसं घडणार असेल, काही अमूर्त असलेलं मूर्त रुपात प्रकटणार असेल, अव्यक्ताला अभिव्यक्तीची वाट मिळणार असेल म्हणून आशा आनंदानं सळसळत असेल कदाचित! पण खरंच असंच काही असेल की आणखी काही?
सावली म्हणजे वेदनेचा झाकोळ देखील असू शकतो, किंवा व्यथेचं मळभ सुद्धा. येणाऱ्या अदृष्टाची चाहूल किंवा गेलेल्या वादळाच्या कटू स्मृतीही! मग हे नक्की काय असेल? या द्विधा मनस्थितीत ते जे काही असेल ते असो, असं म्हणून मनाची विषण्णता घालवण्यासाठी काळोखशिल्प अशा देहाची दीपमाळ उजळली! भग्न मंदिर हे अतर्क्य आयुष्य, देह नश्वर म्हणून तमशिल्पित. पण नश्वर असला तरी जोवर आहे, तोवर त्याला जोपासणं अटळ आहे.
ही सावली कदाचित जवळ येतेय, गवतातून पाऊल वाजल्याचे आवाज यावेत, वाऱ्यावर पाचोळा भिरभिरत जावा तसे विचारांचे भिरभिरणे मनभर सुरू आहे. घालमेल होतेय जिवाची आणि एकाकी वाटेवर चालत असता कुणा वाटसरूनं दूरवरून साद घालावी तशी ‘आतल्या आवाजाची’ जाणीव होते.
‘हे घडून गेलेल्या, मागे पडलेल्या अनुभूतीचा पाठलाग करत राहणं, त्यांतच गुंतून राहणं काही आजचं नाहीय तुझं. तू नेहमीच भूतकालाच्या भग्नावशेषांना भेट देत रहातेस आणि त्यात गुरफटून जातेस.’
असं गुरफटून दिशाहीन होण्यापेक्षा या घटनांतून काही शिकून घे, जाणून घे, या अनुभवांच्या चिंतनातून आपल्या विचारांच्या, कृतींच्या कक्षा वाढव. तुझ्या अस्तित्वाचा अर्थ काय, तू कोण आहेस, का आहेस, अशा उलट-सुलट विचारांचा जो वणवा तुझ्या मनात पेटला आहे तो शांत होऊ दे. आजवर जे घडलं आहे, घडतंय आणि यापुढे घडणार आहे ते अटळ आहे, चुकणार नाही. तेव्हा ते का, कसं, कशासाठी घडलं, घडतंय, किंवा घडेल याचा निष्फळ विचार करू नकोस, जे तुझ्या हाती नाही त्याची चिंता करून व्यर्थ शिणून जाण्यापेक्षा त्याला ओलांडून पुढे जा, हा आयुष्याच्या अंतिम टप्प्यावरचा प्रवास असेल कदाचित. तेव्हा प्राणांची ही थरथरती ज्योत पैलतिरी नेताना जे काही अतर्क्य, अगम्य घडणार आहे त्याच्या आवर्तात गुंतू नकोस, शांत मनानं पैलतीर गाठ. त्यातच जन्माचं सार्थक आहे.’
या अंतरात्म्याच्या समजावण्यानं श्वासांतलं वादळ निवळलं, मन संतुलित झालं, दाट अंधारात जशी वीज चमकून जावी, तसा जाणिवेला उजळून टाकणारा लख्ख प्रकाश पडला अंतरंगात आणि अवघ्या विश्वातल्या अद्वितीय, अमोघ सुरांचं गीत तनामनात, रोमरोमात झंकारत राहिलं.
माझ्या अल्पमतीला उलगडलेलं या कवितेचं अंतरंग असं आहे, कदाचित कवयित्रीला आणखीही काही सांगायचं असेल.
एका विलक्षण अनुभूतीचा तितक्याच ताकदीनं केलेला उत्कट, उत्कृष्ट लयबद्ध आविष्कार आहे ही रचना. रॉय किणीकर यांच्या ‘उत्तररात्र’ ची तीव्रतेनं आठवण करून देणारा रचनाबंध, भुरळ पाडणारी शब्दकळा आणि अस्वस्थतेकडून परिपूर्ण शांतीकडे, अतृप्तीतून तृप्तीकडे जाण्याची वाट दाखवणारा प्रवाही आशय यांनी समृद्ध असलेली.
ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।।
मृत्योर्मामृतं गमय ।
ॐ शान्ति शान्ति शान्ति ।।
अशी काहीशी अनुभूती देणारी ही प्रेरणादायी रचना मला गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या काव्याची आठवण करून देते.'' ...............
* रसप, शेवटी..
या पद्याच्या सर्व ओळी छान
या पद्याच्या सर्व ओळी छान आहेत. त्यातून तुम्हाला जे सांगायचय ते थोडे थोडे प्रचितीला येतय.......
खसफसे गवत वार्यात उडे
खसफसे गवत वार्यात उडे पाचोळा
फिरफिरून प्राण पापणीत होती गोळा
..तो दूर निनादे सूर कुण्या पथिकाचा,
-'तव जुना छंद हा घटनांनी नटण्याचा..
तू विस्तारत जा हृदया-हृदयामधूनी
होऊ दे शांत अस्तिवाचा जठराग्नि
जे घडले,घडते,घडणे याच्यापुढती
ते ओलांडून ने पैल ज्योत थरथरती..'
... अप्रतिम..
क्रांती साडेकर यांनी आज (
क्रांती साडेकर यांनी आज ( २२-०३-२०१३) 'मराठी कविता समूह' मध्ये लिहिलेल्या अप्रतिम रसग्रहणासह ही कविता येथे पुनःप्रकाशित करत आहे.. आभार क्रांती, अशा रचनांना न्याय देणे कवितेवर निस्सीम प्रेम करण्यातूनच साध्य होऊ शकते..
भारती, बरे झाले, इथे दिलेत
भारती, बरे झाले, इथे दिलेत रसग्रहण ते.. अनेकांना कवितेचा अजून जवळून आस्वाद घेता येईल
क्रांति ताई ने खरंच खुश करून टाकलं आज...
खरं सांगू का भारती, (हे मी ताईलाही म्हणालेय...) ही कविता समजते, उमजते, ताईने दिलीये तशी वाचताना... पण ज्या सहजतेने... ज्या हळूवार क्रमाने ताईने रसस्वाद प्रकट केलाय त्यामुळे मन खरोखर आनंदित झाले...
आपली एखादी रचना इतक्या ताकदीने "जगून" पुन्हा आपल्यालाच ती जगण्याची ऑफर दिली असेल तर त्याचा आनंद केवळ अद्वितीय असेल, हो ना भारती?
वाह क्या बात !!!
वाह क्या बात !!!
नेहमीच्या वर्तुळातून बाहेर
नेहमीच्या वर्तुळातून बाहेर पडलेली कविता. खुप आवडली.
आभार सर्व
आभार सर्व आत्मीयांचे.
वैभव,तुम्हाला इथे पाहून खूप बरं वाटलं.
>>आपली एखादी रचना इतक्या ताकदीने "जगून" पुन्हा आपल्यालाच ती जगण्याची ऑफर दिली असेल तर त्याचा आनंद केवळ अद्वितीय असेल, हो ना भारती ?>>
होय बागेश्री, तो आनंद आवरला नाही म्हणून हे पुनःप्रकाशित केले.दुसर्याच्या नजरेत आपण नवे होण्याचा आनंद चिरनूतनच. कवितेखेरीजच्याही संदर्भात जगतो आपण तो. मग कवितेच्या संदर्भात..
मणिकांचन वगैरे वगैरे..
सुरेख कविता. 'भवसागर' या
सुरेख कविता.
'भवसागर' या शब्दाबाबत 'जिथे सतत काहीतरी घडते आहे - भवति भवति भवति..' अशी व्युत्पत्ती वाचली होती त्याची आठवण झाली.
अतिशय सुरेख रचना आणि
अतिशय सुरेख रचना आणि रसग्रहणही..
व्वाह..! आज पुन्हा एकदा
व्वाह..!
आज पुन्हा एकदा वाचली, प्रचन्ड मजा आली.. ग्रेट !!
____/\____ !!
'लखलखले काही जाणिवेमध्ये मधुर' इथे पुन्हा अडखळलो.. काही तरी कराच.........!
आवडले !
आवडले !
छान कविता.
छान कविता.
स्वाती,अंजली,रसप.बंडोपंत,उल्ह
स्वाती,अंजली,रसप.बंडोपंत,उल्हासजी, धन्स मनापासून..
रसप,तुम्हाला तिथे अडतंय हे तुम्ही मला सातत्याने सांगताय्,पण मला तसं होत नाहीय म्हणून मी थोडीशी कन्फ्युझ्ड !
''लख्लख्ले काही जाणिवेमध्ये मधुर'' असा त्या दोन्ही 'खं'चा अर्धा उच्चार करा बघू माझ्यासारखा
कविता आणि रसग्रहण दोन्हीही
कविता आणि रसग्रहण दोन्हीही अप्रतिम
रसपला अनुमोदन