प्रथा ,परंपरा आणि आपण

Submitted by Mandar Katre on 2 July, 2012 - 23:47

आपल्या संस्कृतीत काही प्रथा आहेत.उदाहरण द्यायचे झाले तर शिवरात्रि ला शंकराच्या पिंडी ला पंचामृताने नाहू घालतात मग त्या पिंडीवर दुधाची संतत धार धरली जाते, कित्येक लिटर दुध त्या पिंडी वरून वाहून जाते. त्याच प्रमाणे जैन लोक श्रवण बेलगोळ येथील भगवान महावीर ह्यांच्या भव्य मूर्तीला लाखो लिटर दुधाने धुतात.ते दुध वाहून जाते. शनी शिंगणापुर येथे रोज कित्येक लिटर तेल ओतले जाते ते देखील वाहून जाते.

आपल्या देशात कुपोषण हि भयंकर समस्या आहे. गरीब घरात सकाळी ५०/१०० ग्राम तेल आणले जाते तर संध्याकाळी सध्या पाण्याची फोडणी केली जाते. हेच तेल गरीबात वाटले तर त्यांची पोटे हि भरतील आणि त्यांचे आपल्याला आशीर्वाद हि मिळतील.दूध गरीब मुलांना पाजले तर आपल्याला किती समाधान मिळेल. म्हणून पिंडी किंवा शनि/मारुति वर वाहिले जाणारे दूध /तेल हे खाली मोठी पिंप लावून साठवावे आणि मग ते गरजू /गरीब भक्तांना प्रसाद म्हणून दान करावे .विक्री करू नये .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेकाचे दूध तीर्थ म्हणून लगेच प्यायले जाते... ते साठवून मग वाटले तर मधल्या कालात नासून जाईल.

कुमारी कमला सोनटक्के या इतक्या लहान वयात इतक्या विविध विषयांची इतकी सखोल माहिती बाळगून आहेत याचे नवलच वाटते.

(हा धागा डेड एन्डला पोहोचणार आहे असा एका भ्रष्ट ब्राह्मणाचा शाप आहे) ( Light 1 )

पण मी नेहमीप्रमाणे कु. कमला सोनटक्के यांच्याशीच सहमत आहे

-'बेफिकीर'!

एका लग्नामध्ये सरासरी तीस किलो तांदुळ उधळला जातो, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी पाच लाख लग्ने होतात, 1.5 कोटी किलो तांदुळाची नासाडी. असे अनेक बेजबाबदार प्रकार आपण थांबवु शकतो, शास्त्रापुरते ठीक आहे ,नासाडी नको.

<म्हणून पिंडी किंवा शनि/मारुति वर वाहिले जाणारे दूध /तेल हे खाली मोठी पिंप लावून साठवावे आणि मग ते गरजू /गरीब भक्तांना प्रसाद म्हणून दान करावे>

नंतर त्या गरजू/गरीब भक्तांच्या औषधोपचारांचा खर्च कोण करणार?

भरत Rofl

झी न्यूज ने गेल्या महिन्यात सादर केलेल्या माहीती नुसार

भारतात दर वर्षी ५४००० कोटी रुपयांचे अन्न लग्न समारंभात वाया जाते. हे तयार केलेले अन्न
चांगल्या प्रतीचे असते, त्यात व्हेज नॉन व्हे ज दोन्ही प्रकार असतात. हे अन्न अक्षरशः टाकुन दिले जाते.

भरत, भारीच.
आंग्र्यानु, जल्ला घडेघडेक त्या पेटल्या सरकाराचे तोंडाकडे कश्या बघाक हवा ?
तुमका आमका मिळान काय करूक जमता काय ता बगा.

आमचे लग्नान आमी फुला उधळलीव , अक्षत नको म्हणान त्या बापड्या लग्न लावूक इलेल्या स्वामीन पण सांगल्यान. मंगे सगळ्याम्का घरातच केलेला जेवान घतलाव.

मयेकरान्नू, दूध फेकूक लागता तेल तस्साच बाटलेन भरान देवन चालात.

<म्हणून पिंडी किंवा शनि/मारुति वर वाहिले जाणारे दूध /तेल हे खाली मोठी पिंप लावून साठवावे आणि मग ते गरजू /गरीब भक्तांना प्रसाद म्हणून दान करावे>

नंतर त्या गरजू/गरीब भक्तांच्या औषधोपचारांचा खर्च कोण करणार?
>>>> +१००००

साती, पण ते वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचे कॉकटेल असेल ना? तसेच तेलात मूर्तीला लावलेला शेंदूर इ. येणार नाही का?

खुलभर दुधाची कहाणी लोक श्रद्धेने वाचतात. पण शेवटी देवाच्या डोक्यावर तेल, दुधाची धार सोडायचे काही थांबत नाहीत.

आंग्रे , सरकारने काही केले तर आमच्या(च) धार्मिक बाबतीत तुम्ही हस्तक्षेप करताय असा कांगावा तुम्हीच कराल!

भरत, शनी शिम्गनापूर किंवा शनीच्या अन्य ठिकाणी किंवा काही मारूतीच्या देवळाबाहेर जे लोक तेल घेऊन बसलेले असतात तेच विकण्यात येते. लोक जनरली घरचे तेल नेत नाहित.
पण हो, शेंदूर मिसळुन लीड टॉक्सिसीटी नक्कीच होईल.

तशीही आपल्या देशात इतक्या विविध पातळीवर रिसोर्सेसची इतकी उधळपट्टी चाललेली असत्ते की ते वाचवले तर आनखी दोन भारत आपण एकही छदाम कर्ज न घेता चालवू शकू.

..

अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहणारे देशी पब्लिक सुद्धा लिटर (आमच्या इथे गॅलन!) च्या मापात पिंडीवर दुध ओतायची परंपरा जोपासून असतात. ते सोपस्कार बघून पण मळमळायला होत. मंदिरातल्या पुजारी बाबांशी नवर्‍याने निष्फळ वाद घातला होता. वर कुणीतरी लिहल्याप्रमाणे मी त्यांना खुलभर दुधाची गोष्ट समजावून सांगितली पण शंकर कसा कोपीष्ट देव आहे, पिंडीवर बदाबदा दूध ओतण (?) हे आपल्या वेदात संगितल आहे वगैरे फंडे आम्हाला तार्-स्वरात सांगून फाट्यावर मारल. वरती Take Pride in your religion and customs अस कडक इंग्रजीत बजावल. नो वंडर माझा नवरा देवाच्या अस्तित्वा बद्दलच शंका घेतो (कधी कधी). असल्या निर्बुद्ध प्रथा-परंपराने खुश कसा होतो देव.. अशी आमची हेल्दी डिस्कशन्स होतात. कधी संपणार हे? देव जाणे! का मानव जाणे..पण तरीही न वळणे? असो.

अमेरिकेतील देवळात पिंडीवर दूध ओतताना पाहून मलाही मळमळायला होतं. अमेरिकेतील गायी /म्हशी यांना ज्या पद्धतीने वाढवण्यात येतं ते वाचून तर अधिकच.

@विकु-
अमेरिकेतील गायी /म्हशी यांना ज्या पद्धतीने वाढवण्यात येतं ते वाचून तर अधिकच.
मुंबईला जोगेश्वरीच्या गोठ्यात एक चक्कर मारा. अजून मळमळेल.

उदयन. +१

<< एका लग्नामध्ये सरासरी तीस किलो तांदुळ उधळला जातो >> तो पुन्हा अक्षता म्हणून वापरला जातो. नासाडी होतेच, पण तेवढी नाही.
<<ते सोपस्कार बघून पण मळमळायला होत.>> विचार पटतो, मळमळणे नाही.

- वापरलेले तेल पुन्हा देवाला वापरले जाते (पुजारी, तेल व इतर पदार्थ पुन्हा बाहेर विकण्यासाठी विकतात.)
देवाचे तेल पुर्वी दिव्याला वापरले जायचे.
- भारतात धान्य नासाडी उंदरांमुळे सगळ्यात जास्त होते - गोदामांमधे. नंतर घरगुती नासडीचा क्रमांक. लग्न-देव-धर्म यांचा क्रमांक नन्तर. (संदर्भ आठवत नाही.)

- शिक्षित लोकच नासाडी जास्त करतात हा माझा अनुभव. कदाचित त्याना परवडते म्हणून...

तो पुन्हा अक्षता म्हणूनवापरला जातो. नासाडी होतेच, पण तेवढी नाही.>>>कधी कुठल्या लग्नाला गेला आहात काय? पुढच्यावेळी गेल्यावर पायाखाली किती तांदुळ पडलेले असतात याचा अंदाज बांधा आणि अनेकांच्या चप्पल बुटांखाली घाण झालेले तांदुळ कोणीही पुन्हा वापरत नाही.
जरा आपली निरीक्षणशक्ती वाढवायचा प्रयत्न करा.

<< एका लग्नामध्ये सरासरी तीस किलो तांदुळ उधळला जातो >> तो पुन्हा अक्षता म्हणून वापरला जातो. !!!!!!!!!

बाप्रे!
असं कोण करतं? एकतर अक्षत म्हणजे फ्रेश. कोणतीही क्षती न पोहोचलेले तांदूळ/ज्वारी इ. 'ग्रेन्स'.. अन एकावरून ओवाळून टाकले तर दुसर्‍याला तेच वापरणार का तुम्ही?? तुमच्या लग्नात 'रिसायकल्ड' अक्षता चालतील तुम्हाला?

परंपरा पाळायच्याच असतील तर नीट पाळाव्या. अन सांगावे, की करतो आम्ही उधळपट्टी म्हणून.

एका लग्नामध्ये सरासरी तीस किलो तांदुळ उधळला जातो,
इथे बहुतेक लग्नात फुलाच्या पाकळ्या वापरतात अक्षतांऐवजी.
पिंडीवर बदाबदा दूध ओतण (?) हे आपल्या वेदात संगितल आहे वगैरे फंडे आम्हाला तार्-स्वरात सांगून फाट्यावर मारल.
जेव्हढे जास्त खोटे, तेव्हढे अधिक तारस्वरात सांगणे ही अमेरिकन पद्धत आहे.
नो वंडर माझा नवरा देवाच्या अस्तित्वा बद्दलच शंका घेतो (कधी कधी).
त्याला सांगा यात बिचार्‍या देवाचा काही दोष नाही!! हा जो मूर्खपणा देवाच्या नावाखाली चालला आहे तो केवळ त्या लोकांचा आहे, त्यात देवाचा काही संबंध नाही! देवाला दूध नि तेल नि भाराभर अन्न दिले नाही तर तो काही मरणार नाही! उग्गाच आपण किती श्रीमंत ही प्रौढी मिरवण्यासाठी हे धंदे, त्यात देवाला कशाला मधे आणायचे? त्यापेक्षा देवाच्या नावाने गरजू लोकांना मदत केली तर देवाची जास्त सेवा होईल.

@ झक्की काका,
हा जो मूर्खपणा देवाच्या नावाखाली चालला आहे तो केवळ त्या लोकांचा आहे, त्यात देवाचा काही संबंध नाही! देवाला दूध नि तेल नि भाराभर अन्न दिले नाही तर तो काही मरणार नाही! उग्गाच आपण किती श्रीमंत ही प्रौढी मिरवण्यासाठी हे धंदे, त्यात देवाला कशाला मधे आणायचे? त्यापेक्षा देवाच्या नावाने गरजू लोकांना मदत
केली तर देवाची जास्त सेवा होईल.

वाह! एकदम झक्कास प्रतिसाद.