*गुरूपुजा*

Submitted by विभाग्रज on 2 July, 2012 - 21:48

_/\_!*गुरूपुजा*!_/\_

माझी गुरूपुजा,भजन किर्तण
माझी गुरूपुजा,भजन किर्तण

शब्द होती गंध
सुर होती सुमणे
लय,ताल,गीत होई.......
..................पुजासामुग्री*

चक्षू दोन समई
भावभक्ती तेलवात
तेवती निरंतर.........
...................गुरूचरणी*

धक-धक र्‍हुदयाची
टाळ-चिपळ्या वाजती
पंचेंद्रिय तल्लीन होती......
.................जणू वाद्यवृंद*

चंदनाचा पाट नको
कुबेराचाथाट नको
गुरू रंगे थेट.........
..............भजनी किर्तणी*

माझी गुरूपुजा,भजन किर्तण
माझी गुरूपुजा,भजन किर्तण.

गुलमोहर: 

श्री विभाग्रजांच्या हृदयी सत्प्रवृत्ती व भक्तीचे निर्मळ गंगाजळ वाहत आहे. ते तर गुरूसमानच आहेत. या कोमल मनाच्या रसिक मित्राला सादर दंडवत.

विभाग्रज
तुमच्या गुरुना साष्टांग दंडवत._/\_.

चक्षू दोन समई
भावभक्ती तेलवात
तेवती निरंतर.........
...................गुरूचरणी>>>आवडलं.