"सत्यमेव जयते" भाग ९ - (Think Before You Drink)

Submitted by आनंदयात्री on 1 July, 2012 - 11:46

आज, १ जुलैच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'न पिता' या शब्दप्रयोगाशी अनुप्रास साधण्यासाठी 'पिल्याने' असा शब्द लिहिला आहे तो 'प्यायल्याने' असा वाचावा ही विनंती

पण 'न पिता गाडी चालवल्याने झालेल्या अपघातांची संख्या' पिल्याने झालेल्या अपघातांच्या संख्येहून खूप जास्त आहे हे पेपरमध्ये दिसतेच.

पुन्हा 'फार', ' आकडेवारी आली.... Proud

समजा, दारु न पिलेल्या लोकांकडून क्ष अपघात होतात.. आता हे अपघात होत असताना माणसे शुद्धीवरच असतात आणि तरीही अपघात होतात, याचा अर्थ इतर कारणेही प्रबळ असतात.

याच्या तुलनेने, दारु पिलेल्या लोकांमुळे समजा दोनच अपघात होत असतील. पण या दोन केसेस मध्ये इतर कारणे प्रबळ नसतात... म्हणजे दारु नसती तर हे दोन्ही/ सर्व अपघात पूर्णपणे टळले असते.

उदा. दारु न पिताही अपघात झाला. कारण पावसामुळे निसरडे होते. पण दारु पिलेल्या माणसाकडून निसरडे नसतानाही अपघात होणार, जो दारु नसता तर टळला असता.

त्यामुळे अशा केसेस कमी असतील, पण त्या दारु नसती तर टळल्या असत्या, हा मुद्दा महत्वाचा असतो.

अपघात व्हायला तीन कारणे असतात :
रस्त्यातला दोष
वाहनातला दोष
मानसातला दोष

त्याचे काय आहे कुमारी कमले,

की अर्ग्यूमेन्ट्स सेक साठी काहीही म्हणता येते. पण इतके आहे तर तुमचे पंजाचे सरकार दारूच्या महसूलाकडे कशाला डोळे लावून बसते? करा की अरबस्तानाचा कायदा हिम्मत असली तर? है की नै?

म्हणजे शासनातर्फे दारू मुक्त उपलब्ध आणि नंतर निसरडे होते तिथे प्यायलाच नसतात तर काहीतरी प्रमाण घटले असते हे म्हणायचे.

भारतातल्या नागरिकाने दारू स्वतःच्या घरीच प्यावी असा कायदा आहे का येथे?

की अर्ग्यूमेन्ट्स सेक साठी काहीही म्हणता येते. पण इतके आहे तर तुमचे पंजाचे सरकार दारूच्या महसूलाकडे कशाला डोळे लावून बसते? करा की अरबस्तानाचा कायदा हिम्मत असली तर? है की नै?

अगदी बरोबर.. मीही हेच सांगत आहे.... दारु 'नसणे' महत्वाचे.. म्हणजे अपघात टळला असता. आता दारु नाही याचे कारण, सरकारने दारुच निर्माण होऊ दिली नाही का ती असुनही माणूस प्यायला नाही, हे मुद्दे गौण ठरतात..

सरकार बंदी घालेल न घालेल, आपण न पिणं, हे आपणच सांभाळायचं ना?

सरकार बंदी घालेल न घालेल, आपण न पिणं, हे आपणच सांभाळायचं ना?>>>

इनअ‍ॅडिक्वेट लॉ प्रोव्हिजन्स अ‍ॅन्ड ओव्हर फ्री कल्चर हा प्रॉब्लेम आहे कमला

आपण जे कायदे करतो त्यांचा (आणि त्यांच्या पळवाटींचा) अर्थ काय होतो हे महात्मा गांधींच्या देशाला माहीत असायला हवे नाही का?

र्वांचे पोटापाण्याचे उद्योग, आवक, उदरनिर्वाह, बचत, खरेदी सर्वकाही व्यवस्थित चालू आहे. दारूमुळे दातावर मारायला फुटकी कवडी उरली नाही, दारूमुळे लिव्हर खराब होऊन मेलेत असलं काही झालं नाहीये.
फरक कळतो का?>>>>> यात "अजुनतरी" हा शब्द घातला तर कदाचित वाक्य बरोबर होइल असे वाटते. Sad

अ‍ॅक्चुअली, मी इतकी दारू पीत असूनही आणि ड्राईव्ह करत असूनही मला तोल जावा इतकी कधी चढलीच नाही. म्हणून इतरांना चढू नये असे नाही. पण 'न पिता गाडी चालवल्याने झालेल्या अपघातांची संख्या' पिल्याने झालेल्या अपघातांच्या संख्येहून खूप जास्त आहे हे पेपरमध्ये दिसतेच.>>> बेफिकिरजी.... समजा हे वाचुन कोणितरी बेफिकिर ना चालते आणि मला काय होतय म्हणुन दारु पिउन गाडी चालवली तर? तुमचा लिहण्यामागचा उद्देश काहिही असला तरी हे वाक्य अतिश्य चुकिचे आणि आक्षेपार्ह आहे. आणि अपघाताचे बोलाल तर मागे कुणितरी रेफ्लेक्स टाइम वरुन दारु पिउन आणि न पिता किती सेंकंदाचा फरक पडतो आणि त्यामुळे अपघाताची शक्यता कशी वाढते हे व्यवस्थित सांगितले होते.

तेंव्हा प्लिज drink and drive चे समर्थन करु नका हि नम्र विनंती.

मी समर्थन करतच नाही आहे. पण एखाद्याने असे केले तर भारताचे कायदे अपुरे आहेत. अशोक पाटलांनी काही विशिष्ट मुद्दा नोंदवला त्यावरचा माझा प्रतिसाद हा असा 'जनराअईझ' करणे अयोग्य ठरेल. मी फक्त त्यांना प्रतिसाद दिला.

बेफिकीर जी...

३० एम.जी. की एम.एल. याबद्दल गोंधळ झाला असेल माझा, पण मला खात्री आहे ती '३०' या आकड्याची (आज रात्री यू ट्यूबवर परत एकदा पाहून खात्री करीनच).

एम.जी. डोक्यात बसण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी अशाच एका चर्चेच्यावेळी अमेरिकेच्या कृषी आणि स्वास्थ्य या दोन खात्यांनी 'मॉडरेट/स्टॅण्डर्ड ड्रिंकिंग' ची त्यांच्या तज्ज्ञांकडून जे प्रमाण निश्चित केले होते, त्यावेळी मोजमापात "औंस" या परिमाणाचा वापर केला गेला (त्यांच्या स्टॅण्डर्डायझेशननुसार).

माझ्या माहितीनुसार १ औंस = २० एम.जी. होतात (होत असतील असे म्हणतो.... चू.भू.दे.घे.). २ औंस अल्कोहोल सेवन हे तिथल्या संस्कृतीनुसार "स्टॅण्डर्ड" वा "मॉडरेट" मानले जात असे दिसत्ये. नेमके हेच आपल्याकडील 'सोशल ड्रिंक्स"च्या वेळी होत नाही असे म्हणण्यास जागा आहे.

अशोक पाटील

मी समर्थन करतच नाही आहे. >>> माफ करा पण मी असे करतो असे लिहणॅ म्हणजे एक प्रकारचे समर्थनच आहे असे वाटते. आणि ही बाब D&D करणे पण चुकिचेच आहे ना. कायदे अपुरे आहेत हे एकदम मान्य. (म्हनुनच हा विषय आहे, )

१ औंस म्हणजे ३० मिलिलिटर म्हण्जे बेवड्यांच्या भाषेत १ स्मॉल
आपल्याकडे साधारण १८० मिलि म्हण्जे ६ स्मॉल किंवा ३ लार्ज खूप लोक रिचवतात जे जगातील सरासरी पेक्षा ३ पट आहे.
medically allowed ( not recommended)पुरुष = २ x 30 ml जास्तीत जास्त

Pages