खरेच माझे लक्तर झाले!

Submitted by सतीश देवपूरकर on 29 June, 2012 - 07:28

गझल
खरेच माझे लक्तर झाले!
पण, दुनियेला अस्तर झाले!!

दु:खच माझे घमघमणारे;
तुला आयते अत्तर झाले!

बहुपर्यायी प्रश्न जिदगी;
तरी न लिहुनी उत्तर झाले!

कुरबुर करती तन, मन दोन्ही;
वयही आता सत्तर झाले!

रोज तेच ते ओझे भरतो;
दिनक्रम म्हणजे दप्तर झाले!

वेळापत्रक रोज पाळतो;
जगणे म्हणजे दफ्तर झाले!

दर वस्तूंचे गगनी भिडले!
जीवन आता खडतर झाले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

शेवटी थोडे खडतर खटकते Happy बाकी नेहमीचा बाज सुटला नाही.

खरेच माझे लक्तर झाले!
पण, दुनियेला अस्तर झाले!!

या पेक्षा ----

खरेच माझे लक्तर झाले!
दुनियेला हे अस्तर झाले!! ............. हे छान वाटेल.

_/\_

सर आपले सगळे शेर 'आमद के शेर' वाटतात हल्ली

_____________________________

मी हा शेर असा वाचला..................

जगणे माझे लक्तर झाले!
अन् दुनियेला अस्तर झाले!!

आज्काल आमचा ऑर्फी सुद्धा 'पर्यायी' देवू लागलाय यावरूनच काय ते ओळखा...........:D

______________________________

वयही आता सत्तर झाले!>>>>>>>>>>>>> खोटं...............साफ खोटं !! Angry ( Wink )

डॉक विपूत पाहिलत का ...............

असो.......<<<<<<हे शेर अच्छे आहेतच..... शिवाय ''अपने'' सुद्धा आहेत>>>>>>>>>>>>>.१००% प्रचन्ड सहमत

वैभवजी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
वयही आता सत्तर झाले!>>>>>>>>>>>>> खोटं...............साफ खोटं !!
<<<<<<<<<<<<<
आहो मी ७० वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकाची व्यथा मांडली आहे या शेरात.
माझे वय फक्त ५७ आहे हो!(मी वय, नाव, हुद्दा, फोन नंबर काहीही दडवत नाही). कुठल्याही शेरातील “मी” म्हणजे सतीश देवपूरकरच असतील असे नाही. Please note!
अवांतर: माझा एक शेर आपणास अर्पण करतो...........
तू वाच पान माझे, जे कोणते हवे ते!
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे!!

आपला हितचिंतक,
..............प्रा.सतीश देवपूरकर

" न घेतलेली अनुभूती".......... .या बद्दल परवा आपण मला एका प्रतिसादातून काहीतरी सांगितले होते त्यावरून इथे या शेरात मला जरा विसंगती जाणवली ; गम्मत वाटली म्हणून म्हणालो सर.......... बाकी काही नाही
Happy

तुमचा वर दिलेला शेर छान आहे

"वाचना"वरून मला माझा एक जुना (जुना म्हणजे २-४ आठवड्या पूर्वीचा आहे. २५ /३० वर्षा पूर्वीचा शेर असायला माझे तेवढे गझलनै"पुण्य" नाही ना जमा झाले अजून..........:() .शेर आठवला..............

जिला वाचून माझ्या वेदनांची काहिली शमते
मला ती बेफिकीरी अन् तिचा दे दाह आयुष्या ..............

आपला पर्यायी एकलव्य
वै व कु
Happy

छान