एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे

Submitted by रसप on 29 June, 2012 - 00:36

बोललो जे जे कधी मी बोललो नाही खरोखर
पण तरीही वाद झाला चूक होते की बरोबर !

तोडले नात्यास ह्याचे फारसे ना दु:ख झाले
का न सांगितले कधी तू सत्य लोकांच्या अगोदर ?

भिजवल्या मी पापण्या अन भास झाला पावसाचा
स्वच्छ डोळ्यांनी कधी नव्हते बघितलेले मनोहर

मी तुझ्या डोळ्यांत गंगा पाहिली अन धन्य झालो
लपवतो डोळ्यांमधे लोणारचे खारे सरोवर

दाखवा माणूस जो म्हणतो "सुखी आहे इथे मी"
चेहरा हसरा खरा मी शोधण्या फिरलो घरोघर

एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे
तीच ठिणगी आणि ही कविता असे बहुधा सहोदर

सांगती सारेच, "जीतू, जा तिला विसरून आता"
काय सांगा लागते देण्यास हे सल्ले अगोचर ?

....रसप....
२७ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_29.html

गुलमोहर: 

मस्तये......... Happy

एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे
तीच ठिणगी आणि ही कविता असे बहुधा सहोदर

यातली वेदना आवडली......... Happy

आवडली
बरोबर ,अगोदर ,सहोदर, अगोचर,....... चे शेर मस्त आहेत

बेफीजी म्हणत आहेत तेही लक्षात घेण्याजोगे आहे .....नेमके काय कारायला हवे या बाबत बेफीजींचे मार्गदर्शन घ्याच.......