विठ्ठलाच्या पायी विठ्ठल (वाघ)लीन झाला.

Submitted by vedangandhaa on 28 June, 2012 - 03:51

सांसारीक व्यापातून मनाला विरंगुळा मिळावा,शांतता लाभावी ,असा एखादा छंद ज्यातुन आत्मिक आनंद मिळेल असा एखादा योग सर्वांच्याच वाट्याला येतो असे नाही.
नाव आणि पैसा कमावुनही माणुस तितकासा समाधानी नसतो.धनीकांना धन मिळविन्याचा हव्यास असतो तर प्रतिष्ठितांना आनखी प्रतिष्ठा.तशीच ओढ एखाद्या वारकर्‍याला वरंवार पंढरीला जाण्याची असते. यातुनच कविवर्य डॉ. विठ्ठल वाघयांच्या लेखनीतून "पंढरीच्या वाटेवर" हा कविता संग्रह साकारला.एखद्या कुंभाराच्या हातुन मातीचे लहान-मोठे नवनवीन आकार साकारावेत,चित्रकाराच्या कुंचल्यातून विविध चित्र जन्मावेत अगदि तसच साहित्यीकांचही असत .
"पंढरीच्या वाटेवर"ह नुसता आत्मिक नव्हे तर आध्यात्मिक आनंद देणारा कविता संग्रह आहे.
कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांच्याशी कांही वर्षांपुर्वी जवळून संपर्क एका नतेवाईकांच्या मुळे आला तेव्हा मी माझं लिखाण त्याना दखवायाची तेव्हा ते मला ललित लिही असही म्हणाले, ललित लिहिण काही एवढ जमल नाही पण त्याच दिवशि त्यांनी मला त्यांचा हा "पंढरीच्या वाटेवर" कविता संग्रह दिला आणि मी लगेच त्यांना त्यावर लिहुन दाखवल्...त्यांनी ते सकाळ ला द्यायला सांगीतल, दिलही पण .......असो...आज आच्यानक पुन्हा आषाढी वारीच्या निमित्याने हे मायबोलीवर तर टाकाव अस वाटल. खरच त्यांच्या पुस्तकावर मी लिहीणं ही योग्यता माझी नाही, पण त्यांनी तेव्हा सांगीतल आणि मी ते लिहिल बस्स.....
माणुस कुठेही असला तरी त्याला घराची ,संसाराची सतत आठवण येते, जसे 'सखु चालली पंढरपुरा, वेशीपसून येती घरा' असा प्रकार न घडता मोहापासुन मुक्त होऊन, मन शुद्ध करून, वैराग्य अंगीकारून ,देहभान विसरून केवळ विठ्ठल स्मरत पायी वारी कविने केली .त्यांची कठोर भक्ती म्हणजे 'पंढरीच्या वाटेवर' हा कविता संग्रह.
"आधि चित्त शुद्ध करा
अंगी वैराग्य ते धरा
भक्ती करा शीरजोर
त्याहुनी योग कोणता"

या प्रमाणे तन मन शुद्ध करून पुढे वैराग्य धारण करून ईतर वारकर्‍यांच्या सोबत टाळ मॄदंगाच्या गजरात नाचत विठ्ठलाने विठ्ठल स्मरला. गाडगेबाबांना जसा जळी, स्थाळी ,काष्ठी ,पाषाणी परमेश्वरचा वास, अस्तित्व जाणवले, अनुभूती झाली तशीच अनुभूती कविलाही झाली.ऊन पाऊस थंडी यांचा परीणाम होत नसे.वरकर्‍यांचा देह जणू 'कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल' झाला होता.उन्हाच्या तेजात त्यांना विठ्ठलाचा भास व्हावा,विठ्ठल भक्तीची सावली व्हावी,कडाक्याच्या थंडीत भक्तीची शाल पांघरुण केलेली वारी ,त्यातुन जन्मलेले हे दिव्य म्हणजे "पंढरीच्या वाटेवर" हा संग्रह होय.
दगडगोट्यांचा, काट्याकुट्यांचा रस्ता चालतांना कितीतरी काटे टोचले असतील असंख्य ठेचा लागल्या असतील पण वारीत कवीला आलेला अनुभव हा अनन्यसाधारण आहे.ते म्हणतात...
" पंढरीच्या वाटेवर
कुठे नाही काटाकुटा
बाप विठ्ठल झाडीतो
त्याच्या पावलान वाटा,

नाही दगडगोट्याच
पायी चालताना भय
खाली पदर अंथरी
माझी रखुमाई सय"
या वारीत वारकरी रंगून जातात. रस्त्यावरची उडनारी धुळ त्याना भक्तांवर चाललेली अबिराची उधळण वाटते.या " पंढरीच्या वाटेवर" चालताना राजवाड्यातले पाय सुद्धा थकत नाहीत .त्यांचा अहंकार विठ्ठलाच्या पायी गळुन पडतो.म्हणुनच त्यांना विलासी सुखापेक्षा परमानंदाची अनुभुती होते .
एवढ चालूनही त्यांचे पाय दुखत नाहीत, जणू चालून चालून थकलेल्या भक्तांचे पाय विठ्ठलाने चेपून दिले कि काय? अस वाटत्..याचाच अर्थ असा कि जो परमेश्वर पदी लीन होतो त्याचे दु:ख ,पीडा हरण तो दयाळु कणवाळु पांडुरंगच करतो.
कुणी अभंग म्हणतो, कुणी दिंड्या पताका नाचवतो,कुणी मौन नामस्मरण करतो.वारकर्‍यांना हा सोहळा भारून टाकतो.रिंगण बघायला जमलेली मंडळी, रिंगण भेदणार्‍या वारूकडे डोळ्यात तेल घालून बघत असते.माणसानेही हे संसारिक चक्राचे रिंगण ज्ञानेश्वरांच्या वारूप्रमाणे भेदून 'हे विश्वची माझे घर' समजून एकरूप व्हावे, समभावाने रहावे असे कविला वाटते.ईतका ध्यास या विठ्ठलाचा लागवा कि आत्मा चैतन्यमय व्हावा व मन आभाळाएअवढे व्हावे. त्यांच्या एका कवितेत कवि म्हणतात....
"जीवा संसार चक्राचे
असे रिंगण भेदावे
विश्व समजुनी घर
त्याशी एकरूप व्हावे,

काळ्या सावळ्याचा ध्यास
शुभ अश्वास लागावा
जडातून बद्ध झाला
जीव चैतन्याचा व्हावा"

'चंद्रभागेच्या तीराला संतमेळा दंग झाला' हे काही खोट नाही.चंद्रभागेत नाक धरून डुबकी मरली की पापक्षालन होते अशी रुढी आहे. तारणारा व मारणारा तूच पांडुरंगा असे स्मरून वरकरी भक्तमंडळी ईथे नाक धरुन डुबक्या मरतात.त्यांचे अवयव काम करतात ,मुखात मात्र पांडुरंगाचे नामस्मरण असते.तनामनाने विठ्ठलाशी लीन झालेल्या वरकरी स्त्रीया कुणी वेणी फणी करतात तर कुणाला त्याच भानही नसत्,ओव्या गातात फुगड्या खेळतात त्या विठ्ठलाला रिझवन्याचा पुरेपुर प्रयत्न करत अहेत असच वाटत्.चंद्रभागेच्या स्नानाने त्यंचा देह पावन झाला,त्या नितळ जळाला पाहून स्पर्शून जीवनाचा अम्हाला अर्थ कळला असे 'अंघोळ' या कवितेत कवि म्हणतात.
मैलो न मैल वारकर्‍यांची वारी चाललेली असते .चालून चालून त्यांच्या पायाला घाट्टे पडलेले असतात ,फोड आलेले असतात . त्याची जानेवही त्यांना नसते . कारण ते काया, वाचे, मन पांडुरंगाचे झालेले असतात. गाव ,पाणवठा पाहून वारकरी मंडळी पोटापाण्याच्या व्यवस्थेला लगतात. शीधा सामग्री काढेपर्यंत कुणी काटक्या कुटक्या (सरपण) आणत्,कुणी दगडाची चूल मांडत.स्वयंपाक होतो. श्लोक आणि पांडुरंगाच्या नाम स्मरणात जेवणं होतात्.एरवीचे घरचे चारीठाव जेवण त्यापुढे फिके पडते.विठ्ठल नामाचा भक्तीरस ओतून रांधलेल्या अन्नाची सर ती पुरणपोळीलाही येत नाही हा वारकर्‍यांचा अनुभव आहे.
टाळमृदंगाच्या साथीने विठ्ठल नामाच्या जयघोषात छोट्या मोठ्या तिर्थांना भेटी देत हा निघालेला संतमेळा ,लवाजमा मोठ्या आतुरतेने पांडुरंगाला याची डोळा याची देही पाहण्यास अगतिक झालेले असतात. याचे कान विठ्ठलाच्या जयघोषाने तृप्त होतात्,डोळे विठ्ठल रखुमाईला पाहून सुखावतात. हे वारकरी जणू आपल्या ईंद्रीयांना बजावतात की...
"घेई घेई माझे वाचे
गोड नाम विठोबाचे,
तुम्ही ऐका रे कान
माझ्या विठोबाचे गुण,
डोळे तुम्ही घ्यारे सुख
पहा विठोबाचे मुख."

आश्या प्रकारे तनामनाने विठ्ठलमय झालेल्या वरकर्‍यांच्या बरोबर हा वाघ ही (कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ)विठ्ठलमय होउन पायी वारी केली व वारकरी सांप्रदायासह त्याचा आनंद अनुभवला.त्यातच त्यानी अपला संग्रह पुर्णपणे वारीतच लिहिला.त्याच्या "पंढरीच्या वाटेवर" मधील प्रत्येक कविता हा त्यांचा स्वानुभव आहे ,त्यातच ती जन्मलेली आहे.वाराकर्‍यांच्या भावनेच चित्रण ,अभिव्यक्ती म्हणजेच "पंढरीच्या वाटेवर" होय. "धन्य तो विठ्ठल आणि धन्य हा विठ्ठल"

सौ. विनिता लक्ष्मन पाटिल(कुलकर्णी)
डोंबिवली(पु.)९७०२७२०८००

गुलमोहर: