नंदन नाचण

Submitted by स्मितहास्य on 28 June, 2012 - 02:08

या पक्षाला बर्‍याच दिवसांपासून कॅमेर्‍यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले.

नावः नंदन नाचण.
स्थळः वसंत विहार. ठाणे
===============================================================================

गुलमोहर: 

शेपटाकडून फोटो आहे का काढलेला? त्यावरून पण सांगता येईल. पण साधना म्हणते तशी नाचणच वाटतिये.

"ही" का "हा" कळत नाहीये, पण नाचण नक्कीच...... सुर्रेख टिपलाय......
पक्ष्यांचे फोटो काढायला फार पेशन्स पाहिजे आणि थोडेसे लक्.....

मस्त Happy

छान!

पक्षाचे eyebrows(?) मस्त एकदम!

(ते गंजलेलं रेलींग टच-अप करता येईल का?)

Canon EF70-200mm f/2.8L USM>> अंदाज बरोब्बर आला Happy

एस एल आर घेतला की ही आणि 2X एक्सटेंडर घ्यायच स्वप्न आहे. Happy

धन्यवाद मंडळी.. Happy
(ते गंजलेलं रेलींग टच-अप करता येईल का?)>>> आरामात करता येईल. पण मग ती क्रिएटिविटी होईल फोटोवर केलेली. त्यापेक्षा मूळ फोटो जसाच्या तसा ठेवण्याचा प्रयत्न होता.

एस एल आर घेतला की ही आणि 2X एक्सटेंडर घ्यायच स्वप्न आहे.>>>>> जबरदस्त. कधी घेताय मग? लवकर घ्या. शुभेच्छा त्यासाठी. Happy

झकास Happy