Submitted by रुणुझुणू on 27 June, 2012 - 07:55
हे लेकाने काढलेलं डिजिटल जंबोजेट.
"तुझ्या फ्रेंडस् ना दाखव ना" असा आदेश (!) आल्याने इथे प्रकाशित करत आहे.
खिडकीतून दिसणारे जीव (अनुक्रमे) :
१. मांजर (टॉम बोका)
२. जर्मन शेफर्ड कुत्तु
३. चित्रकार स्वतः
४. आई (अस्मादिक)
५. पप्पा
६. आजोबा
७. जेरी उंदीर (खालच्या छोट्या खिडकीत)
जेरीला एकट्यालाच का रे खालच्या रांगेत बसवलंय ? ह्या प्रश्नावर "बराय तो तिथेच. नाहीतर टॉमची आणि त्याची च्याऊम्याऊ चालू होईल लगेच. म्हणून मी दोघांना दोन टोकांना बसवलंय..." हे उत्तर मिळालं 
त.टी. -
कुत्तु-माऊला माणसांच्या आधीची जागा का दिली गेली आहे किंवा मुळात अवकाशात प्राणी (माणूस सोडून) नेण्याची परवानगी आहे का, हे प्रश्न विचारायला परवानगी इल्ला 

आणि ही आपली सूर्यमाला....
(ह्याबद्दल काही लिहिणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे :))

गुलमोहर:
शेअर करा
गोड चित्रं.
गोड चित्रं.
कसली गोड आहेत ती चित्रे.
कसली गोड आहेत ती चित्रे. मस्तच !
आभार्स. << जरा मोठं टाकायचं
आभार्स.:)
<< जरा मोठं टाकायचं चित्र. खिडकीतले जीव नीट दिसत नाहीत आम्हाला..>>
लोला, सायो, मृण्मयी - मोठं चित्र अपलोड होत नाहीये. मी प्रयत्न केला होता.
<< बोले तो येकदम झक्कास>> किरण, तुझी कमेंट ऐकवली त्याला. खुष...
<< इतकी मंडळी घेऊन अवकाशात जायचं म्हणजे खायचं काम नाही! >> अगदी अगदी
<< हिंदी राष्ट्रभाषा नाही हा मायबोलीवरचा जुनाच वाद नव्याने रंगेल >> अरे देवा, असं पण आहे का ? वादाचं फलित काय होतं ? की अधांतरीच ?
<< (चांगलं केलयं ड्रॉविंग - गार्गी)>> वत्सला, तुमची मुलगी ना ? धन्यवाद तिलाही.
<< कारण, आपण काढलेलं बरोबर आहे का, समोरच्याला ते आवडेल का - हे प्रश्न त्यांच्या मनाला शिवत नाहीत.>>
ललिता-प्रिती, खरंय तुमचं. हेवा वाटतो ह्या वयातल्या मुलांचा. कसली गुंतागुंत नाही, मला वाटलं ना मग मी काढलं. निरागस.
<< रुणुझुणुचाच लेक म्हटल्यावर कल्पनाशक्ति, आत्मविश्वास, वगैरे सगळं असणारच.....>> शशांकभौ, हरभर्याचं झाड मोडेल हं, मी जाडू आहे
भारी कल्पनाशक्ती आहे!!
भारी कल्पनाशक्ती आहे!!
भन्नाट
भन्नाट
झक्कास..........काय
झक्कास..........काय कल्पनाशक्ती आहे.....वा !
अय्यो रे, काय गोडु चित्रं
अय्यो रे, काय गोडु चित्रं आहेत दोन्ही. एवढुश्या मेंदुमधे किती काय काय विचार. स्वप्नातली यानामधुन मारलेली चक्कर ! ते सुद्धा सगळ्या आवडत्या माणसांबरोबर आणि शिवाय पेटसना बरोबर घेवुन.
सहीच ग
सहीच ग
शाब्बास, मस्त चित्र आहे.
शाब्बास, मस्त चित्र आहे.
सृजन नावाप्रमाणेच सृजनशील आहे.
शाब्बास बाळा ! कल्पनाशक्ती
शाब्बास बाळा !
कल्पनाशक्ती खरंच अफाट आहे सृजनची... असेच प्रोत्साहित कर त्याला
भारी !
भारी !
कसलं गोड! शाब्बास सृजन.
कसलं गोड!
शाब्बास सृजन.
कित्ती गोड काढलंय!! खूप खूप
कित्ती गोड काढलंय!! खूप खूप आवडलं... सृजनला शाब्बासकी आणि गोड गोड पापी!!
भारीच आहेत चित्र
भारीच आहेत चित्र
मस्त मस्त गोग्गोड चित्र
मस्त मस्त गोग्गोड चित्र काढलीयेत सृजननी. विमानात उजवीकडून डावीकडे माना हळू हळू लंबे होत गेल्यात. आजोबांची मान तर जिराफाशी झक्कास स्पर्धा करतीये. कस्लं गोड आहे हे प्रकरण!
आणि ते सूर्यमालेला व्यापून उरणारं रॉकेटही किती मस्त आहे. शाब्बास सृजन!
ऐ किती गोड .. नावाप्रमाणेच
ऐ किती गोड .. नावाप्रमाणेच सृजनशक्ती जबरदस्त हाये लेकाची... मस्त!!! ब्राईट..

'मां, मेरी तरफ से तुम्हारे दोस्तों को शुक्रिया कहना " असा निरोप आह''
आभार. <<एवढुश्या मेंदुमधे
आभार.:)
<<एवढुश्या मेंदुमधे किती काय काय विचार. >> हो ना मनिमाऊ.
विमानात उजवीकडून डावीकडे माना हळू हळू लंबे होत गेल्यात. आजोबांची मान तर जिराफाशी झक्कास स्पर्धा करतीये.>>
आजोबांची आणि आईची हेअरस्टाइल पण अगदी सेम टु सेम, फक्त आजोबांचे केस पांढरे आणि आईचे काळे 
मामी
वर्षु
नाद खुळा हाइत चित्र. आमी
नाद खुळा हाइत चित्र. आमी मानसास्नी न्हेलं न्हाइ कवा. आनी पोरानं प्रानी न्हेले बगा.
पोरगं नाव काडनार पुढं
फार छान चित्र..
फार छान चित्र..
शाब्बास सृजन , मस्त काढलय
शाब्बास सृजन , मस्त काढलय चित्र !
हे खरचं भारी आहे हं. मला त्या
हे खरचं भारी आहे हं. मला त्या शेपटाकडील ज्वाला लै आवडल्या...
Pages