जंबोजेट जंबोजेट झुईं ssss

Submitted by रुणुझुणू on 27 June, 2012 - 07:55

हे लेकाने काढलेलं डिजिटल जंबोजेट.

"तुझ्या फ्रेंडस् ना दाखव ना" असा आदेश (!) आल्याने इथे प्रकाशित करत आहे.

खिडकीतून दिसणारे जीव (अनुक्रमे) :
१. मांजर (टॉम बोका)
२. जर्मन शेफर्ड कुत्तु
३. चित्रकार स्वतः
४. आई (अस्मादिक)
५. पप्पा
६. आजोबा
७. जेरी उंदीर (खालच्या छोट्या खिडकीत)

जेरीला एकट्यालाच का रे खालच्या रांगेत बसवलंय ? ह्या प्रश्नावर "बराय तो तिथेच. नाहीतर टॉमची आणि त्याची च्याऊम्याऊ चालू होईल लगेच. म्हणून मी दोघांना दोन टोकांना बसवलंय..." हे उत्तर मिळालं Lol

त.टी. -
कुत्तु-माऊला माणसांच्या आधीची जागा का दिली गेली आहे किंवा मुळात अवकाशात प्राणी (माणूस सोडून) नेण्याची परवानगी आहे का, हे प्रश्न विचारायला परवानगी इल्ला Proud

spaceship.png

आणि ही आपली सूर्यमाला....
(ह्याबद्दल काही लिहिणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे :))

GALAXY.png

गुलमोहर: 

फोटोतला ना Happy
कल्पनाशक्ती, त्याचं भावविश्व अफाट आहे. खूप सुंदर !!
किती वर्षांचा आहे छोकरा ?

किती सुंदर आहेत चित्रं, टॉम अन जेरीला नेलं म्हणजे बाकीच्यांच्या करमणूकीची सोय झाली की . आर वी देअर येट म्हणायचा चांस नाही Happy

जंबोजेट भारीच. शाब्बास रे पठ्ठ्या ! जेरीची स्पेशल खिडकी मस्तच आहे Happy

आणि तो खालच्या चित्रात पृथ्वीवरचा गंगा यमुनेचा संगम दिसतोय ना रे?

आईग्ग! कित्ती गोड!! Happy
अफाट कल्पनाशक्ती आहे गं! खिडकीतुन बघणारे सगळे जीव लई भारी. Lol
आणि खालच्या सुर्यमालेतील ग्रह ओळखता आले बरं का!

लै भारी!!! मस्तचं आहेत चित्र! वेल डन बेटा Happy

कल्पनाशक्तीचा वारसा मिळालाय लेकाला आईकडुन<< + १ अगदी अगदी Wink Lol

छान.

सृजनला दाखवल्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया. खूष झालाय गडी.
" मां, मेरी तरफ से तुम्हारे दोस्तों को शुक्रिया कहना " असा निरोप आहे.
(सध्या नोबिता आणि डोरेमॉनमुळे आमच्याकडे राष्ट्रभाषेचं वारं लईच जोरात वाहतंय :हाहा:)

सांजसंध्या, हो बरोब्बर, फोटोतलाच. पावणेसहा वर्षाचा आहे. बाकी तुम्ही म्हणताय ते खरंय...त्याचं कल्पनाशक्ती आणि भावविश्व खरंच अचंबित करतं आम्हाला.

मेधा, अगदी अगदी. टॉम आणि जेरी आहेत म्हटल्यावर अवकाशातही खिदळण्याची कारंजी उडत राहणार...

माधव Lol नाही, ते समुद्र आहेत.

आर्या, सूर्यमालेतल्या मंगळ आणि गुरू ग्रहांनी कुट्टुकुट्टु (केशकर्तन) केलं नाहीये बरं का Lol

वर्षा, नाही गं...त्याच्या अफाट कल्पनांपुढे मैं किस झाड की पत्ती....

धन्यवाद सगळ्यांना.

चित्रं, कल्पना आणि त्यातले रंग सगळंच फार आवडलं. पण खिडक्यांमधून डोकावणारा ऐवज दिसत नाहीये. इतकी मंडळी घेऊन अवकाशात जायचं म्हणजे खायचं काम नाही! Happy

मस्त जमलंय. थोडं मोठं करुन टाकता आलं तर खिडकीतल्या मानव + प्राण्यांची सभा दिसेल. Wink
>>डोरेमॉनमुळे आमच्याकडे राष्ट्रभाषेचं वारं लईच जोरात वाहतंय>> नहींsssssss. हिंदी राष्ट्रभाषा नाही हा मायबोलीवरचा जुनाच वाद नव्याने रंगेल Proud

छानच !! Happy

चित्रं आवडलं, पेक्षा कॉन्फिडन्स आवडला. (या वयोगटातल्या सर्वच मुलांकडे असतो तो - असं माझं मत) कारण, आपण काढलेलं बरोबर आहे का, समोरच्याला ते आवडेल का - हे प्रश्न त्यांच्या मनाला शिवत नाहीत.

रुणुझुणुचाच लेक म्हटल्यावर कल्पनाशक्ति, आत्मविश्वास, वगैरे सगळं असणारच.....
शाब्बास शाब्बास दोस्ता.... कीप इट अप.....

Pages