लहान मुलांचे वेळापत्रक [वय १ ते २]

Submitted by प्रितीभुषण on 25 June, 2012 - 04:25

माझी लेक आता १९ महिन्याची झाली आहे
आधी जायची प्ले स्कुल ला [मी जोब शोधत आहे ना म्हणुन मला वेळ मिळावा म्हणुन मिच घातल्ले तिला पण आता घरीच ठेवलय
तिचे वेळा पत्रक कसे बनवु
तुमच्या पैकी कुणी आसे बनवले आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

?

जरा प्ले स्कुल ला जात असेल तर वेळा पत्रकाला महत्व आहे. बाकी तुम्ही तिला किती वाजता उठवता? घरात कोण आहेत? त्या वर सगळे अवलंबुन आहे.

माझी मुलगी लहान असताना साधारण दिड वर्षांची असताना मी तिला प्ले स्कुल ला घातले. तिला ते फार म्हणजे फारच आवडले. कारण ती खुप अ‍ॅक्टीव्ह होती. तिला आमच्या बिल्डींग मध्ये ही खेळायला फार आवडायचे. साधारण सकाळी ७ पर्यंत उठायची. मग पॉटी. मग दुध आणि काहीतरी खायला ज्यात बहुतेकदा पोळी, घावन, मऊ मऊ खीर, मऊ भात किंवा ओटस ची खीर असायची. जेवढे तिला जाइल तेवढे. मग बाबा बरोबर आंघोळ. तिची शाळा ९ ची होती. तिला आम्ही साधारण साडेआठ्ला घरातुन काढायचो. शाळेत ती खुप मस्ती करायची. तिकडे खायला बहुदा फळं द्यायचो. ती खुप लहान पणा पासुन आवडीने फळं खाते. मग तिची शाळा ११ ला सुटायची. साबा तिला घ्यायला जायच्या. ती घरी आली की तिला भयानक झोप आलेली असायची. मग ती एक कप दुध पिउन झोपायची. साधारण १.३० पर्यंत उठायची. मग आजोबां बरोबर गॅलरीत बसुन चीउ काउ करत भात किंवा पोळी खायची. साधारण ३.३०. ला परत झोपायची ती ४.३० ला उठायची. मग बिल्डींग मधले कोणी ना कोणी खेळायला यायचेच. किंवा कामवालीची मुलगी यायची. त्यांच्या शी घरातच खेळायची. ६ वाजता राजगीरा / बेसन / रवा यां पैकी कोणतातरी लाडु खाऊन आजी बरोबर खाली जायची तिकडे तिन चाकी सायकल वर बसणे, घसर गुंडी, झोका, बॅट बॉल, धावाधावी..... असे मनसोक्त खेळुन बाई साहेब ८ वाजता घरी यायच्या. मग आई शी ( अस्मादिकांशी) खेळुन, बाबाशी खेळुन मग जेवण करुन साधारण १० च्या सुमारास दामटुन ( जन्मा पासुन अत्ता पर्यंत म्हणजे ११ वर्षं ची होइ पर्यंत झोपायला दामटायलाच लागते) झोपणे....

हा दिनक्रम आर्थातच सगळ्यांच्या सोयी ने आणि प्रत्येकाच्या वेळे नुसार साधारण असाच असायचा. पण मी कधीही फार आग्रही भुमिका घेतली नाही. तसेही आपण येवढ्या लहान मुलांना काय वेळापत्रक लावणार!!!! फक्त खाणे पिणे जपायचे येवढेच. वेळच्या वेळी खाणे पिणे पोटात गेले की मुलं चांगली टमटमीत होतात. माझी लेक फळे, सुप्स, घावन, धीरडी, डोसे, इडली, वरण्+भात, ताक, दुध, लाडु, खीरी हे अगदी आवडीने खायची ( अजुनही खाते). आम्ही तसे देखिल घरात पाव्/ब्रेड फार कमी खातो. अगदी १५ दिवसातुन एखाददा.... ते ही बहुतेक मला बरं नसेल तरच ब्रेड नाश्त्यात वा डब्यात असतो. तेही दिले तर काकडी+टोमाटो+ बीट चे सँडवीच असते. लहान पणी दुध मात्र भरपुर प्यायली. तसेच तिला अनेक बिस्किटे पण आवडतात. पण ती फक्त दुपारच्या वेळी खात असे. ( हल्ली तर फारच कमी झालय. सध्या वयात येते आहे ना!!! फीगर जपायची आहे तिला!!!)

बाकी भरपुर खेळ, चित्र रंगवणे, भिंती वर चित्र काढणे, वेड्या सारखे इकडे तिकडे धावणे, घरात ग्रील वर चढणे, ह्या कोचा तुन त्या कोचात उड्या मारणे.... हे महत्वाचे कार्य होते.......

तुमच्या मुलीली फळांची आवड नसेल तर नका देऊ. काही दिवसांनी पुन्हा गोड फळापासून सुरुवात करून बघा. खूप कडक असं वेळापत्रक कामी येत नाही. मला लहानपणापासूनच फळं आवडत नाहीत. अगदी अजूनही आंबा सोडला तर फारशी फळे खात नाही. पण बाकीचा आहार व्यवस्थित चालू असेल तर काळजीचे कारण नसावे. जो नवा पदार्थ द्यायचा आहे त्याची गोडी लागणे महत्वाचे, पण ते हळूहळू होईल.
आजच्या दिवसाच्या वेळापत्रका साठी काल रात्रीच्या झोपण्यापासून सुरुवात करावी असे वाटते.

माझा मुलगा पण पुढच्या महिन्यात २ वर्षाचा होईल. अजून तरी मी त्याला प्ले स्कुल ला घातले नाहीये. त्याच वेळापत्रक असा आहे
८ पर्यंत तो उठतो, मग अंघोळ आणि काही तरी खायला (दुध+बिस्कीट, ओट्स ची खीर, शेवया, नाचणी सत्व, शिरा), नंतर आम्ही दोघे ऑफिस ला गेल्यानंतर तो बिल्डींग मधल्या मुलांबरोबर खेळत असतो, १-१.३० ला आजी त्यला चपाती + वरण भरवते, जेवून झाल्यावर तो झोपतो मग उठल्यावर थोड्या वेळाने केळ खाउन घरातच खेळतो, तो पर्यंत त्याचे बाबा येतात ऑफिस मधून, मग त्यांच्या बरोबर खेळतो, कधी तरी ते त्याला फिरवून आणतात नाही तर घरातच चार्ट लावला आहे त्यावर शिकवतात. बस मग रात्रीचा जेवण आणि ११ -.३० पर्यंत झोपतो परत.

आमच्या घराजवळ कुठे मैदान नाहीये त्यामुळे आम्ही दोघे घरी असलो कि त्याला जरा लांब एक गार्डन आहे तिथे घेऊन जातो, तिथे मग भरपूर खेळतो तो

मला अजून हि फक्त त्याच्या चावून खाण्याबद्दलच प्रश्न आहे Sad अजून हि तो काही खात नाही स्वताच्या हाताने, किवा आम्ही भरवलं तरी सुद्धा, तो फक्त सरळ गिळता येणारेच पदार्थ खातो Sad