जळालेल्या मंत्रालयाचा आनंदोत्सव

Submitted by मीरा जोशी on 24 June, 2012 - 07:21

जळालेल्या मंत्रालयाचा नागपुरातील 'बार'मध्ये आनंदोत्सव .............

मुंबई येथईल मंत्रालयाची इमारत गुरुवारी आगीत भस्म झाली. यात अनेक महत्वाच्या खात्यांची कार्यलयातील पाईली सुद्धा जळाल्या. या जळालेल्या फाईलमध्ये अनेकांचे काळेपिवळे बंद होते. या फाईली जळाल्याचा आनंद काही अधिकाऱ्यांनी नागपूरात साजरा केला.
गुरुवारी मंत्रालयाला आग लागल्याची माहीती नागपूरात धडकताच अनेकांनी टिव्ही ऑन केली. नागपूरातील अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात त्याच्यात्याच्या खात्यात केलेल्या घोटाळ्याच्या फाईल मंत्रालयात पडून होत्या. परंतु मंत्रालयाला आग लागल्याची माहीती त्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी आपल्या फाईली असलेल्या कार्यालयाला आग लागल्याची माहीती जावून घेतली. यांनतर ते महाशय थेट पोहचले धरमपेठ येथईल बारमध्ये , येथे आल्यानंतर त्यांनी न्युज चॅनल ऑन करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी मंत्रालयाला लागलेल्या आगीचा आनंद उत्सव साजरा करण्यात सुरुवात केली.
चॅनलवर आग लागल्याची व धुवा दिसत असल्याची दुश्य दिसताच हे अधिकारी आपसात चर्चा करीत होते. एकाने तर चक्क ' तो बघ धुर ,तो तुझाच फाईलचा आहे ' असे वाक्य उद्गारले. यानंतर पुन्हा त्यांनी पॅक रिचवण्यास सुरुवात केली. अर्धा तासाच्या अवधीत या बारमध्ये डझनभर अधिकारी गोळा झाले. ज्यांच्या घोटाळ्याच्या फाईली जळाल्या त्याचे सहकारी अभिनंदन करीत होते आणि तो अधिकारी आणखी एक पॅक घ्या असा आग्रह सहकाऱ्यांना करीत होता. दरम्यान अनेक जन यात मोठा अधिकाऱ्याने माझआ बङी दिला , त्याच्या आदेशाने मी हे काम करीत होता , तो मात्र सुटला असे बोलने सुरु होतो. कधी दोन पॅगच्या वर मी घेत नाही असे म्हणीत अनेकांनी अनेक पॅग रिचविले. जवळपास दोन तास त्यांचा आनंदउत्सव या बारमध्ये सुरु होता.
बिल देतांना सुद्धा हे अधिकारी इतके आनंदीत होते की , सर्वच जन मिच बिल देतो असे म्हणत होता. गुरुवार असला तरी अनेकांनी मासांहाराचा सुद्धा आस्वाद घेतला खरा परंतु ज्यांच्या फाईल जळाल्या त्यांनी देवाची कृपा झाली असे समजून मासांहार खाण्याचे टाळले. सिगरेटचा धुवा उडवित सर्व अधइकारी आपणावरील मोठे संकट टळले असे बोलत होते. काही अधिकारी तर रात्री उशिरापर्यंत आपला हा आनंद उत्सव साजरा करीत होते. त्याच्या या आनंदरात वेटरचा मात्र चांगलाच फायदा झाला कारण प्रत्येकाने वेगवेगळे बक्षीस त्याला दिले.

- उज्वल भोयर - नागपूर यांच्या बातमीवर आधारित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl
मंत्रालयात नक्की कुठल्या प्रकरणांच्या किती फाइल्स जळाल्या ह्याची तपशिलातली मोजणी अजून धड झालेली नाहीये आणि आग विझायच्या आधीच नागपुरात टिव्हीवर अधिकार्‍यांना त्या त्या फाइल जळाल्याचे दिसले!! वा वा वा काय पण दिव्यदृष्टी

बाकी लोक फायली जळाल्या म्हणून दु:खात पण ढोसू शकतात की. Wink

मीरा जोशी, गेट वेल सून.

अरेरे, किती बिचार्याना छळताय?
तिकडे तुमचे आनंदयात्री नुसते सत्यमेव जयते भाग अमूक म्हणुन लिहितात त्यावर धावत जावून प्रतिक्रिया देता Happy आणि इकडे आमच्या या जोशी बाई कुठून कुठुन काय काय कॉपी पेस्ट करून किती कष्टाने चिकटवतात तर असं हिनवता काय नी अ‍ॅदमिनकडे तक्रार करता काय नी काय काय! समजते बरं आम्हाला ही कंपूबाजी सगळी.

मीराजोशी, समयोचित बातमी पुरविलित Happy
अशा अनेक पार्ट्या झाल्या अस्तील्/होत अस्तील्/होणार अस्तील.
बायदिवे, काल रविवारी दुपारी एक बातमी फुटली होती की दिल्लीतील गृहमंत्रालयाच्या इमारतीत्/की कुठेतरी आग लागली. टीव्हीवर दुपारी खालिल सरकत्या पट्यान्मधे दाखवली होती, मात्र संध्याकाळी त्या बातमीचा कोणत्याच च्यानेलवर मागमुस नव्हता. अन आजचे न्युजपेपर बघता आले नाहीत.
याबाबत कुणाला काही माहिती आहे का? Happy

हो ना. अगदीच समयोचित. कस्ला सोप्या भाषेत उलगडत नेलाय पट! अत्यंत माहितीपूर्ण व संयत लिखाण. विषय खुलवून मांडण्याची हातोटी वाखाणण्याजोगी!! आणखी येऊ द्या!

(साडेदोन 'पॅग' वाला) इब्लिस

म टा कडून याहून अपेक्षा ठेवताय का ज्ञानेश?
एक जयंत पवार जे काय लिहित असतात म टा मधे ते वगळता काहीही वाचण्यासारखं नसतं नॉर्मली.

मीराजी
भोयर यांनी वर्णिलेली पार्टी म्हणजे या घटनेमुळे झालेल्या पार्ट्यांच्या हिमनगाचे टोकावरील नगण्य असा कणच असेल.

आता अनेकजण संकटमुक्त झाल्याने .विकासोन्मुख (विकास कोणाचा?). अशा विविध कामांची रास लागेल. मग का नाही आनंदोत्स्तव साजरे होणार?

आता सगळ्यांना सगळे वाचणे अशक्य! तेव्हा तुम्ही ही बातमी येथे चिकटविली त्याबद्दल धन्यवाद!

समजते बरं आम्हाला ही कंपूबाजी सगळी.>>> समपूर्न अन्मोदन!!!
मीरा जोशी, पूजा जोशी, रमा नामजोशी, अविनाश जोशी... कन्फ्युज्ड !>>> या सर्वांचा लसावी काय येतो बरे? Wink

दासुजी,
>>मग का नाही आनंदोत्स्तव साजरे होणार?<<

हे आनंदोत्स्तव म्हंजे नक्की काय हो?

आता अनेकजण संकटमुक्त झाल्याने .विकासोन्मुख (विकास कोणाचा?). अशा विविध कामांची रास लागेल. मग का नाही आनंदोत्स्तव साजरे होणार? >>>>>>
.
.
आज हसायला फार आले.........:हाहा:

ही टेबल न्यूज आहे... भंकस. इव्हेन्ट एन्कॅश करण्याचा निंद्य प्रयत्न. म. टा. आता अस्तित्वाची लढाई लढतो आहे हे नक्की.त्यामुळे कमरेचे डोक्याला गुंडाळणे भाग आहे. Happy

क्याब्रेचा इथे काय सम्बन्ध बाजो? अन तरणीचा क्याब्रे त्वा कुठे केव्हा बघितलास? गुर्जीन्ची शिम्टी आठवली नै का तेव्हा? Proud
उग्गा आपल कैच्याकै! Happy

लिंबुजी दिल्लीतील गृहमंत्रालयाला लागलेल्या आगिवर मार्मिक व्यंगचित्र..:)