आयला, तुझी अदा..... लय भारी

Submitted by kishorbpanchal on 22 June, 2012 - 10:03

आयला, तुझी अदा..... लय भारी

चोरुन बघतेस
खुद्कण हसतेस
मी बघताच मात्र
अजाण बणतेस
लय भारी

आयला, तुझी अदा..... लय भारी

केसांचा लटटु
गालांवरची खळी
जणू उमलली
नाजुकशी कळी
लय भारी

आयला, तुझी अदा..... लय भारी

- किशोर ब. पांचाळ

गुलमोहर: