मोबाईल नंबर पोर्टिंग किंवा सर्किट चेंज- मुंबई ते पुणे

Submitted by mansmi18 on 20 June, 2012 - 13:10

नमस्कार,

माझा मोबाईल (वोडाफोन सर्विस) मुंबईत घेतला होता. नंतर मी पुण्याला शिफ्ट झालो. पण नंबर मुंबईचा असल्याने इथे रोमिंग मधे जात आहे आणि कॉल्स महाग पडत आहेत.

१. मी नंबर पोर्ट करुन घेतला तर तो मुंबई सर्किट मधुन पुणे सर्किट मधे जाईल का?
२. वोडाफोन स्वतः असा सर्किट चेंज करु देतात का?
३. (पुण्यातुन दुसरा सिम घेण्याचा पर्याय सोडुन) इतर काही पर्याय आहेत का? (मला नंबर बदलायचा नाही आहे शक्यतो).

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. असे होउ शकेल. नंबर ३ महिन्यांपेक्षा जूना असल्यास. नंबर तोच ठेवून सर्व्हिस प्रोव्हायडरही बदलता येउ शकेल.

यावर मी केलेला उपाय. माझा ही नंबर व्होडाफोन चाच. मी पुण्यातुन मुंबईला शिफ्ट झाले. मलाही रोमिंग चार्जेस लागत होते. म्हणुन मी पुण्यातुन पोर्टेबलिटी साठी मेसेज करुन पोर्टेबलिटी नंबर मिळवला. त्यामुळे आपला कस्टमर दुसरी कडे जाऊ नये म्हनुन मला व्होडाफोन चे कस्टमरकेअर चे फोन येऊ लागले व माझा प्रोब्लेम विचारला व रोमिंग चार्जेस रद्द केले. नंबर अजुनही पुणे रजिस्टरच आहे पण रोमिंग चार्जेस मात्र आता लागत नाहीत.

कंपनी बदलायची असेल तर तुमच्या जवळच्या मोबाइल दुकानात तुमचा मोबाइल द्या.. तो त्यातुन पोर्टेबिलिटीसाठी एक एस एम एस करेल आणि मोबाइल लगेच तुम्हाला परत देईल. चार पाच दिवसात तुम्हाला एक कोड तुमच्या मोबाइल वर एस एम एस मध्ये येतो.

मग तो कोड आला की पुन्हा त्या दुकानात जा. तो हव्या त्या कंपनीचा फॉर्म भरुन घेईल. फोटो, रेशन कार्ड वगैरे लागेल. त्यात तो कोड लिहेल. मग तुम्हाला तो नविन सिम देईल. ते ठेऊन घ्या.. जुनाच सिम चालु ठेवा.. सात दिवसात जुना सिम बंद होईल. त्याचा अर्थ नवा सिम चालु झाला. मग नवा सिम घालून मोबाइल वापरा. नंबर तोच राहिल.

२० रुपयांत बीएसेनेल चे १००० एसेमेस चं पाकिट मिळतं. तितक्याच ४-५ रुपये इकडे तिकडे करत इतर कंपन्यांचंही मिळत असेल. एक तस्लं पाकिट घ्या. १०-२० रुपयांत नवा सिम मिळतो. १ दिवसांत सुरु होतो. नव्या सिम वरून जुन्या फोनबुकातल्या सगळ्यंना एसेमेस करून नवा नंबर कळवा.
हाकानाका.
उगा डोक्याला ताण रहात नाही की यांनी पोर्ट केला का अन मला रोमिंग लावून लुटताहेत का..

टीपः त्या कंडीशन क्र.३ मधील शक्यतो तोच नंबर हवा असे आपण म्हणतो, म्हणून लोकांना लुटतात हे मोबाईलवाले. डिएन्डी ला रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला आहे का कुणि इथे? होतच नाही असा माझा तरी अनुभव आहे Sad

डिएन्डी ला रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला आहे का कुणि इथे?...>>>... मोबाईल ऑपरेटरनी सांगितल्या प्रमाणे DND सुरु करायचा प्रयत्न केल्यास पहीले दोन दिवस समाधान मिळते, त्या नंतर त्यांचे 'पहीले पाढे पंचावन्न' सुरु होते... त्यावर मी केलेला उपाय (माझा मोबाईल ऑपरेटर idea) - मोबाईल ऑपरेटरच्या Customer Service Dept. (मोबाईल ऑपरेटरच्या वेब-साईटवर शोधावे लागेल्)ला अत्यंत 'अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत' e-Mail लिहिणे, त्याची CC पोलीस-खात्याच्या Cyber Crime Investigation Branch, आणी जवळच्या Consumer Forum (District Level) ला पाठवणे. अक्षरशः झक मारत हे लोक पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर संपर्क करतील. त्यांच्याशी जरा देखिल 'नरमाई'ने न-बोलता (पलीकडून बोलणारी व्यक्ती 'मुलगी/ महीला/ स्त्री' असली तरी), त्यांच्यावर यथेच्छ तोंड-सूख घ्या (त्या लोकांनी DND Active करुन देण्याचं कबूल करे पर्यन्त)... बहुतांशी तुमचं DND पुढच्या दोन दिवसात कार्यरत होईल... मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे, गेले ६-७ महीने मी फालतू मार्केटींग कॉल्स आणी SMS पासून मुक्त झालोय....
Happy