एक पत्र!

Submitted by चिखलु on 20 June, 2012 - 12:09

नमस्कार,

नक्की माहित नाही, तुला हे माहित कि नाही. माहिती असेल तरीही वाच एकदा. आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींचा त्रास होतो. सहन होत नाही. दुसऱ्याच ऐकायचा नसता. असा वाटतं सगळं जग खायला उठला आहे. आणि आपण अजूनच खचून जातो. असा वाटतं सगळं दुखः देवाने आपल्यालाच दिले आहे. आणि मग निराशेचा खेळ चालू होतो.

आपण इतिहासात एक धडा शिकलो, मला वाटतं शिकलो नाहीच मुळी, फक्त परीक्षेपुरता अभ्यास केला. सिंहगडचा धडा. तानाजी मालुसरे आठवतात का? स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून ते लढायला गेले. काय काम करायचे ते? युद्ध??? ते सुद्धा तलवार आणि ढाल घेऊन. जन्म मृत्यू असं कितीसं अंतर असतं? एका क्षणाचे? तू आई-बाबांच्या सांगण्यावर जीव द्यायला तयार होशील का? मग तानाजी कुठल्या आशेने मरायला तयार झाले होते? आणि तेही त्यांना असं काय मिळणार होतं? किती आनंदाने ते लढायला गेले... किती दुर्दम्य इच्छाशक्ती होती त्यांची? मला धडा आठवतो, चौथीचा, त्यात लिहिला होतं, अंगावर, छातीवर वार झेलत तानाजी लढत होते, ढाल तुटली, पागोटं रक्ताने भरलं. तरीही ते त्वेषाने लढतच राहिले. अंगरखा रक्ताने माखला, रक्त भळा भळा वाहायला लागलं. त्यावेळेस वाचताना त्यांचे कर्तुत्व नाही कळले, पण आज संदर्भ लागतात. असा वाटतं थोड्या थोड्या गोष्टीने कुरकुर करणारे आपण, आणि अंगावर वार झेलणारे तानाजी. किती फरक आहे. आणि म्हणूनच त्यांचा नाव आज इतिहासात अमर आहे.

खरी गम्मत तर पुढे आहे. ८० वर्षाचे शेलार मामा, काय विचार आले असतील त्यांच्या मनात. सामोरे तानाजी रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. धिप्पाड उदयभान लढतोय, काय आले असेल त्यांच्या मनात? त्यांना दुखः झाले असेल का? कि भीती वाटली असेल त्या क्षणी उदय भानाला पाहून? त्यांच्या मनात पळून जावे असा वाटला असेल का? किती हिमतीने त्यांनी तरण्याबांड उदयभानावर वार केला असेल? नक्की अशी काय उर्जा होती त्यांच्या मध्ये, जी माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये नाहीये? आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची टाकत ८०व्या वर्षी कुठून आली?

बघ जरा विचार कर, आजूबाजूच्या परिस्थितीने खचून जायचे कि खंबीरपणे उभे राहून परिस्थिती बदलायची.
हा एक धडा जरी शिकलो तरी आयुष्य चांगला होईल आपला.
आणि हो, आपला आयुष्य खराब करायचा अधिकार आपण सोडून कुणालाच नाही. प्रयत्न कर आणि मोठी हो.

तुझाच
-चिखल्या

गुलमोहर: 

>>नक्की अशी काय उर्जा होती त्यांच्या मध्ये, जी माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये नाहीये? आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची टाकत ८०व्या वर्षी कुठून आली?<<

वाचनीय लेख. आपणच यामाग्ची शोधलेली कारणे लिहिलीत तर वाचकाच्या विचाराला चालना v disha मिळेल.

दामोदरसुत, अजय जवादे
धन्यवाद

दामोदरसुत,
मला वाटता खालील कारणं असावी
१) दुर्दम्य इच्छाशक्ती..
२) संस्कृत मध्ये एक म्हण आहे, "गतम न शोकम" म्हणजे जे निघून गेलं आहे त्याचं दुखः करू नये, वास्तवाला सामोरं जावं. शेलार मामानी नेमका तेच केलं, वास्तवाला सामोरे गेले ते
३) त्या काळात नेहमीच युद्ध व्हायची, मोठे कुटुंब असायची, युद्ध आणि मृत्यू हे समीकरण असायचा, त्यामुळे असावे कदाचित, योध्यांची मनही कणखर असावीत, शेलार मामांना बर्याच युद्धांचा अनुभव होता
४) तानाजींना कोसळलेलं पाहून शेलार मामांना बदला घ्यावा असा वाटून ते उदयभानावर चाल करून गेले असावेत
५) सगळ्यात महत्वाचे म्हणजे पराभूत होऊन परत जाण्यापेक्षा मृत्यू परवडला अशा विचारसरणीची ती माणसे होती.

आवडला

vinayakparanjpe, शुभांगी कुलकर्णी , सारन्ग आणि Ratan.Jadhav
>>>>>>>>
धन्यवाद