अरे अरे बळीराजा

Submitted by अनिल तापकीर on 20 June, 2012 - 07:06

||
तू नावाचाच राजा ||
तुझं भांडवल करून |
पुढारी मारतात मजा ||
अरे अरे बळीराजा ||

तुझ्या राज्यामध्ये असतो दुष्काळ ||
ओला असो वा सुका ||
तुझ्यासाठी तो फक्त काळ ||
तुझी स्वप्ने होत जाती वजा ||
अरे अरे बळीराजा ||

महागाईने कहर केला ||
भाव मिळेना शेत मालाला ||
तुझा कर्जाचा डोंगर वाढतच गेला ||
दलाल बघत्यात मजा ||
अरे अरे बळीराजा ||

कर्ज फिटता फिटेना ||
मदत मिळता मिळेना ||
निसर्ग बी साथ देईना ||
सतत कर्जाचा तो बोजा ||
अरे अरे बळीराजा ||

शेतामध्ये गाळतो तू घाम ||
मुखी तुझ्या हरीनाम ||
शेत हेच तुझे चारीधाम ||
मिळत नाही कधी रजा ||
अरे अरे बळीराजा

देवाला बी दया येईना ||
सपनं तुझी पुरी होईना ||
कष्ट करणे कधी थांबेना ||
म्हणूनच होशील एक दिवस,
तू खरा बळीराजा ||
अरे अरे बळीराजा ||

गुलमोहर: