आषाढ्स्य प्रथम दिवसे

Submitted by नितीनचंद्र on 20 June, 2012 - 04:53

आषाढाचा पहिला दिवस आणि सृजनांना महाकवी कालिदास आणि मेघदुताच स्मरण न झाल्यास नवल. कालिदासाने लिहलेले मेघदुत जसे काव्यप्रकार म्हणुन आपला ठसा उमटवते तसेच ते उत्तम कल्पनाविष्कार म्हणुनही भावते.

कथेवर आधारीत काव्य हा प्रकार भारतीयांना नवीन नाही. रामायण आणि महाभारतासारख्या कथा व त्यावर आधारीत महाकाव्ये हजारो वर्षे भारतीय समाजमनाच्या ह्र्दयात स्थान मिळवुन अबाधीत राहिली आहेत.

रामायण किंवा महाभारतासारख्या काव्यप्रकारात मानवी जीवनाचे सर्व पैलु आहेत म्हणुनच की काय समाजाच्या सर्व स्तरावर ही काव्ये अजरामर आहेत.

मेघदुताचे असे नाही. मेघदुत आहे प्रेमकाव्य. आहे. या विषयी अधीक मी लिहणे या पेक्षा मागील वर्षी ईसकाळ मध्ये आलेल्या लेखाची लिंक उघडुन तो लेखच वाचणे जास्त आनंददायी होईल.

http://72.78.249.125/esakal/20110702/5181489934945893259.htm

या लेखाचा उद्देश आणखी निराळाच आहे. पुण्याचे डॉ.भावे यांना मेघदुताच्या या काव्याने भलतेचे वेड लावले. ईसकाळमध्ये आलेल्या लेखात मेघदुताच्या मार्गात येणाया नद्या, पर्वत इ च्या सौंदर्याचा उपयोग काव्यात कालिदासाने कसा करुन घेतला याबाबत त्रोटक वर्णन आहे. डॉ.भावे यांना ही सौंदर्यस्थळे भलतीच भावली आणि त्यांनी कालीदासाच्या मेघदुताचा वेगळ्या पध्दतीने अभ्यास करण्याचा ध्यास घेतला.

व्यवसायाने सर्जन असणारे डॉ. भावे उत्कृष्ट वैमानीकही होते. त्यांनी विमानाने प्रवास करत मेघदुताच्या प्रवासाच्या मार्गाने आणि त्या वेगाने प्रवास करत या मार्गाचे चित्रिकरण अवलोकन केले. एक अदभुत निष्कर्शाप्रत डॉ. भावे पोहोचले तो असा की कालीदासाच्या या मेघदुताचा निर्मीतीकाळ एक हजारवर्षांपुर्वीचा आहे हे गृहीत धरले असता त्या काळात एक हजार फ़ुट उंचीवरुन उडणारी विमाने नव्हती. अश्या काळात जे द्रुष्य डॉ. भावेंना एक हजार फ़ुट उंचीवरुन विमान प्रवास करताना जी दृष्ये दिसली तशीच्या तशी कालादासाने एक हजार वर्षांपुर्वी आपल्या काव्यात वर्णन केलेली आहेत. उदा. नर्मदा नदीचे वर्णन व एक हजार फ़ुट उंचीवरुन तीचा दिसणारा आकार इ.

याचा अर्थ कालीदासाला उच्च प्रतीची प्रतिभातर होतीच या शिवाय एक तर दिव्य द्र्ष्टी होती किंवा आकाशगमनाची सिध्दी सुध्दा असावी. अन्यथा एक हजार फ़ुट उंचीवरुन दिसणारे विहंगम द्रूष्य़ कालीदासाला काव्यात्मक लिहणे व जे आजच्या काळात प्रतित होणे कसे संभव झाले असते ?

याबाबतचे सर्व अनुभव सुमारे १५-२० वर्षांपुर्वी डॉ. भावे यांनी दै. सकाळ मध्ये लिहले होते तसेच त्यांची मुलाखत सुध्दा दुरदर्शन वर या विषयाला धरुन झाली होती. माझ्या मते हा सर्व प्रवास त्यांनी एका पुस्तक रुपाने प्रसिध्द केला आहे.

याचा संदर्भ " I met Phil Philips of 8 Sqn, a pilot, when he'd brought the Beech V-Tail Bonanza belonging to Dr. Bhave of Poona to Juhu Aerodrome in '97. Dr. Bhave had actually taken his aeroplane to trace the entire route of Kalidasa's 'Meghadoota,' some years ago. " या वाक्याने
http://www.bharat-rakshak.com/IAF/History/1940s/Vengeance-Tales.html या वेबसाईटवर अधोरेखित केलेला आहे.

दुर्दैवाने डॊ भावे यांनी लिहिलेल्या या विषयावरच्या पुस्तकाचा संदर्भ मात्र आज आंतरजालावर मिळत नाही. माझ्याही या विषयातल्या आठवणी पुसट होत चालल्या आहेत. माझ्या स्मरणजालावर इतकेच संदर्भ शिल्लक आहेत डॉ भावे, कालीदास आणि मेघदुत.

गुलमोहर: