Submitted by वैवकु on 19 June, 2012 - 04:03
तुला म्हाईत न्हाई बोलला तो कोन होता गं
मला तो ओळखीचा पन् तुला अन्नोन होता गं
मला बघ जायला पाय्जे कसाय्तो पाह्यला पाय्जे
बरं न्हाई म्हने त्याला इठ्याचा फोन होता गं
कसा हायेस तू म्हंता अधी तो हासला होता
"सुखी ..!" म्हन्ण्यात त्या त्याच्या दुखाचा टोन होता गं
तुजा-माजा जसा संकल्प हाये एक होन्याचा
तसा माजा-इठ्याचा तो अधीपासोन होता गं
घरी आली इचाराया मला आषाढवारी ती
"कुठं होतास तू होवून वर्षे दोन होता?".......... गं!!
मला बघ जायला पाय्जे;
कसाय्तो पाह्यला पाय्जे ;
बरं न्हाई म्हने त्याला ..................
...................इठ्याचा फोन होता गं !!
_____________________________________
गुलमोहर:
शेअर करा
वैभवजी, एका वेगळ्या बाजाची
वैभवजी,
एका वेगळ्या बाजाची रचना. सर्व खयाल मस्त. खेड्यातील भाषेस गजलेत आणलेत या बद्दल आपले अभिनंदन.
अन्नोन कसाय्तो
अन्नोन

कसाय्तो
तुजा-माजा जसा संकल्प हाये एक
तुजा-माजा जसा संकल्प हाये एक होन्याचा
तसा माजा-इठ्याचा तो अधीपासोन होता गं>>
सुंदर कल्पना
वेगळीच कल्पना, आवडली...
वेगळीच कल्पना, आवडली...
तुम्हाला "ग" ची बाधा झाली हे जाणवतय या गझलेतून
निशिकांतजी , गिरीजा , बेफीजी,
निशिकांतजी , गिरीजा , बेफीजी, नानुभौ
मनःपूर्वक धन्यवाद
______________-
नानुदेवा: बरोब्बर ओळखलंत !..............ती 'गं' ;दुसरी / तिसरी कुणी नसून पहिलीच आहे होsss ..............;)!!
..............आय् मीन माझी गझल आहे ती!!
ग फॉर गझल ......... कृ गै न!!:D
सुंदर कल्पना
सुंदर कल्पना
तुला म्हाईत न्हाई बोलला तो
तुला म्हाईत न्हाई बोलला तो कोन होता गं
मला तो ओळखीचा पन् तुला अन्नोन होता गं ...
मस्त..
सुंदर गझल... ग्रामीण ठसका
सुंदर गझल...
ग्रामीण ठसका मस्त झाला आहे..
मतला आणि
'तुजा-माजा जसा संकल्प हाये एक होन्याचा
तसा माजा-इठ्याचा तो अधीपासोन होता गं'
हे शेर फार आवडले..
एक वेगळी गझल वाचायला दिल्याबद्दल आभार..
उमेश, रोहन
उमेश, रोहन ,वैभव,.........धन्यवाद !!!
तुजा-माजा जसा संकल्प हाये एक
तुजा-माजा जसा संकल्प हाये एक होन्याचा
तसा माजा-इठ्याचा तो अधीपासोन होता गं
हे लै आवडलं!
धन्यवाद रसप
धन्यवाद रसप
ग्रेट
ग्रेट ....................!!
सिम्पल्ली ग्रेट ......!!
__/\__ __/\__ __/\__
क्ष.य.ज्ञ. जी धन्यवाद
क्ष.य.ज्ञ. जी धन्यवाद