अशी वागते मी तशी वागते

Submitted by प्राजु on 19 June, 2012 - 00:40

अशी वागते मी तशी वागते
जराशी जगावेगळी वागते..

नसे काहि नातेच माझे तुझे
तरी होउनी मी तुझी वागते

कशानेच ओथंबले ना कधी
तशी मी म्हणे कोरडी वागते

जरी चार भिंतीत कंगालता
समाजात मी भरजरी वागते

मनाशीच संवाद चाले कधी
तिथे त्या क्षणी मी खरी वागते

तशी चेहर्‍याने सुखी भासते
कधी वाटले नाटकी वागते??

जगावेगळे 'प्राजु' काही नसे
तसेही खरे का कुणी वागते!!!

-प्राजु

गुलमोहर: 

अहाहा........... मस्तच गं !!

ओरीजनल प्राजु स्टाईल गझल .........
खूप छान वाटतंय वाचून

छान गझल

कशानेच ओथंबले ना कधी
तशी मी म्हणे कोरडी वागते

जरी चार भिंतीत कंगालता
समाजात मी भरजरी वागते

मनाशीच संवाद चाले कधी
तिथे त्या क्षणी मी खरी वागते

--- शेर आवडले

तशी चेहर्‍याने सुखी भासते
कधी वाटले नाटकी वागते

हा शेर असाही करता येईल

कधी चेहर्‍यावर सुखे फासते
असे वाटते.... नाटकी वागते!

चु भु द्या घ्या