मायबोलीवरची तांत्रिक अडचण

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

काल (१७ जून २०१२) रात्री ११ पासून(US EDT) मायबोलीच्या डाटाबेससर्वरवर काही तांत्रिक अडचणी दिसायला लागल्या. त्या दूर करण्याचा पहाटे २-२:३० पर्यंत प्रयत्न केला पण अयशस्वी झाला. त्यामुळे नाईलाजाने मायबोली बंद ठेवावी लागली. याचा अजून एक परिणाम म्हणजे रात्री ११ वाजता साठवलेल्या मजकुरापासून पुन्हा सुरुवात करावी लागते आहे. आणि रात्री ११ नंतरचा मजकूर नष्ट झाला आहे. ११ते २ मायबोली फक्त मधूनच उपलब्ध होती त्यामुळे बहुतेक लेखनावर परिणाम झाला नाही. पण तरी कुणी नेमक्या त्याच वेळात लेखन केले असेल तर ते नष्ट झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

विषय: 
प्रकार: 

माबो परत चालू झाली हे बरं झालं.
मी जेव्हापासून आहे माबोवर तेव्हापासून पहिल्यांदाच एवढा वेळ सलग बंद असल्याचं आठवतंय.

पुर्ण दिवस माबो शिवाय Sad
बाप्रे
बर झालं आज मी पुर्ण दिवस कामात होते
नाही तर वेडं लागलं असतं माबोशिवाय
आता एकदाची सुरु झाली साईट
हुश्श!

अट्टल दारुडे दारूचे दुकान अजून उघडले नसेल तर उगाच दुकानासमोरून चकरा मारतात तशी बहुतेकांची अवस्था झाली होती.

अथक प्रयत्न करून पुन्हा सुरू केल्याबद्दल अभिनंदन.

ब्रेकिंग न्यूज ...

नवी दिल्ली ( पी टी आय) :२०११-१२ अर्थिक वर्षात भारताच्या राष्ट्रिय उत्पनात झालेली ४.३% घट पाहून अर्थमंत्रालयाने रियल टाईम सिस्टीम ( Real Time GDP Monitoring System - RTGMS ) विकसीत केली होती. सोमवार दि १८ जून रोजी अचानक १०.३% वाढ झाल्याने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केले. योजना आयोगाचे अध्यक्ष अहलूवलिया यांनी "एस अ‍ॅण्ड पी चे थोबाड फोडले" अशा शब्दात आपले मत व्यक्त केले. मायबोली.कॉम बंद असल्याने ही Productivity Gain झाली असे अर्थमंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

मायबोली.कॉम रोज सायंकाळी फक्त साडेसात ते साडेआठ या वेळेतच उपलब्ध करावी असा प्रस्ताव काँग्रेस प्रवक्ते दिग्विजय सिंग यांनी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रिय सल्लागार समितीकडे पाठवला आहे. कपिल सिब्बल यांनीही या प्रस्तावास अनुकुलता दर्शविली आहे.

अट्टल दारुडे दारूचे दुकान अजून उघडले नसेल तर उगाच दुकानासमोरून चकरा मारतात तशी बहुतेकांची अवस्था झाली होती. >>>> Rofl

अट्टल दारुडे दारूचे दुकान अजून उघडले नसेल तर उगाच दुकानासमोरून चकरा मारतात तशी बहुतेकांची अवस्था झाली होती.

अथक प्रयत्न करून पुन्हा सुरू केल्याबद्दल अभिनंदन.

+++++++++++++++++++++++++++++++१११११११११११११११११११११११११

क्षणभर वाटले की आयडींच्या मार्‍यामार्‍या मुळे आणि प्रक्षोभक लिखाणांमुळे मायबोली बंद करायचे ठरवले की काय?

दिवसभर काही तरी महत्त्वाचे हरवल्यासारखे वाटत होते, पण एक मात्र खरे, गेल्या १० दिवसांचे काम आणि आजच्या दिवसभरातील कामाचे Output सारखेच होते Happy

बापरे!
खरेच फाटली होती माझी
म्हटलं माझा आयडी डिलीट केला अ‍ॅडमिनने..
दिवस भरात १०० वेळा तरी लॉगीनचा प्रयत्न केला.
Wink
असो.
Am glad to b back! and am glad am back at Maayboli!

एक प्रश्न - मायबोली काही कारणानिमित्त बंद ठेवावी लागली त्यसंबंधी माहिती मायबोली बाहेर कुठे मिळेल? म्हणजे exact status कळत राहिले तर अंधारात चाचपडायला नको.

अट्टल दारुडे दारूचे दुकान अजून उघडले नसेल तर उगाच दुकानासमोरून चकरा मारतात तशी बहुतेकांची अवस्था झाली होती..

>>> प्रचंड... Rofl

>>>एक प्रश्न - मायबोली काही कारणानिमित्त बंद ठेवावी लागली त्यसंबंधी माहिती मायबोली बाहेर कुठे मिळेल?
माबो चे फेबु स्टेट्स अप्डेट करता येईल का?

>>>पण जे फेबुवर नाहीत त्यांनी काय करावे?
त्यांना माबोपत्रक ज्या प्रमाणे पाठवले जाते तशी ई-मेल पाठवावी. हाकानाका Happy

शापित गंधर्व >>> १ नं. भारी क्रिएटिविटी.
फोटोत चेहरा दिसल्याबद्दल तुमचे २० गुण कटाप पण सुलेखनासाठी जास्तीचे ५.

'मायबोली डाऊन असतांना करावयाचे ऊद्योग' असा धागा काढा आता.

'मायबोली डाऊन असतांना करावयाचे ऊद्योग' ह्या धाग्याची नितांत गरज आहे. 'मायबोली बंद झाल्यावर स्वतःला कसे सावरावे' याविषयी तज्ञ लोकांनी मार्गदर्शन करावे.

हो न अशी बंद झाली माबो कि वाटत आपल्याच इथे काहि प्रॉब्स आहे की काय? काय झालय ते कसे कळावे? अन इतका वेळ बंद अस कधीच नाहि झाल.

आम्ही दुधाची तहान ताकावर भागवली मायबोली थोबाड पुस्तकावर आहे तिथे, पण आता कळले की किती व्यसनाधीन झालोय ते मुक्तागण मध्ये अडमिशन घेऊ म्हणतोय Happy

Pages