Submitted by निशिकांत on 17 June, 2012 - 11:49
खेकड्याची चाल आता चालतो मी
जो पुढे जाईल त्याला ओढतो मी
सागराच्या तांडवाला टाळतो मी
शोधण्या मोती तळाला राहतो मी
धर्मशास्त्रातील तत्वे वाचलेली
वागताना बासनी गुंडाळतो मी
शोधली पळवाट मांसाहार खाण्या
जानवे खुंटीस तेंव्हा टांगतो मी
कोण मेले कोण जळते काय त्याचे !
भाकर्यांना त्या चितेवर भाजतो मी
पाहिले अन् भोगले अन्याय इतके !
फक्त डोळेझाक करणे जाणतो मी
पारध्यांना हूल देवुन वाचलेल्या
सावजांच्या धडधडीला ऐकतो मी
जीत सत्त्याचीच होते शेवटी पण
मालिकांतुन दुष्ट खोटा गाजतो मी
दर्शनी "निशिकांत" कुस्ती खेळसी का?
वास्तवाला भीत दर्पण फोडतो मी
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
गुलमोहर:
शेअर करा
वाssssव...... अफलातुन.
वाssssव...... अफलातुन.
प्रत्यक शेर अतिशय आवडला.(आशय तर माझ्या अगदी आवडीचे मांडले आहेत.)
धन्यवाद निशिकांतजी.
पुलेशु.
छान ऑर्फी : निशिकांतकाकांशी
छान
ऑर्फी : निशिकांतकाकांशी संपर्क साध (नंबर दिला आहेच बघ त्यांनी!! )
ते तुला छान छान गझला करायला नक्की शिकवतील ( शिवाय तुला खेटरांचा मारही खावा लागणार नाही ते तेवढे दयावान व प्रेमळ आहेत ;))
वैभू.... तू यापुर्वी कधीतरी
वैभू....
तू यापुर्वी कधीतरी नक्कीच खेटराचा मार खाल्लेला दिसतोयस. त्याशिवाय का खेटर जोड्यांची पारायणे करतोस.
छान हं छान हाहा
कोण मेले कोण जळते काय त्याचे
कोण मेले कोण जळते काय त्याचे !
भाकर्यांना त्या चितेवर भाजतो मी
पारध्यांना हूल देवुन वाचलेल्या
सावजांच्या धडधडीला ऐकतो मी>>
सुंदर, पारध्यांचा शेर विशेष आहे