"सत्यमेव जयते" भाग ७ (Danger At Home)

Submitted by आनंदयात्री on 17 June, 2012 - 00:18

आज, १७ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे तर मुलींचे सोशल कंडिशनींग पण नाही की, 'तुला सासरचेच ऐकायचे, तेच तुझे घर' वगैरे पण तरीही हिंसाचार आहेच.

देश कोणताही असो हिंसाचार आहे हेच खरे.>>>>>> +१

ते पितॄसत्ताक मी पुरुषसत्ताक ह्या अर्थानी घेतले आणि त्यामुळे भारतातच फक्त हा हिंसाचार का नाहीये हे समजू शकतं.

केदार आणि दीपांजलीशी सहमत. उलट शन्नो मी बुरखा घेणार नाही असं म्हणाली आणि अमिरने गप्पपणे का होईना पण ते अ‍ॅप्रिशिएट केले ही केवढी मोठी गोष्ट आहे! यावर अक्षरशः जिहाद होऊ शकतो किंवा एखादा मुस्लिम धर्मगुरू अमिरविरुद्ध फतवा काढू शकतो.

केदारः छानच पोस्ट!

मला नाही पटल कि आमीर जाणून बुजुन मुस्लिमांची पॉझिटिव्ह बाजू समोर आणतोय. रादर--समाजाला भेडसावणार्‍या ह्या मुद्द्यांपासून कुठलाही धर्म, जात, आर्थिक स्तर सुटला नाही हे त्याला दाखवायच असेल. ते 'आपा" वगैरे संबोधन खटकल नाही पण बंगाली मुसलमान आपा हे संबोधन वापरत नाहीत. ते दिदि म्हणतात. इति माझा बंगाली कलीग! मग मला आमीरचा होमवर्क कच्चा वाटला.

मामीच्या इतर मुद्द्यांना अनुमोदन, पण शो इंटेण्ट बद्दल डिजे, केदार वगैरेला

नंतर जरी एक्सप्लिसीट मुस्लीमवादी भाग आले, किंवा तो पॉलिटीक्स मधे शिरला जरी, तरी या (आतापर्यंतच्या) एपिसोड्सबद्दल मी त्याला बेनेफीट ऑफ डाऊट देईन. कराकी ट्रीट मुसलमानांना भारतीय म्हणून.

केदार आणि दीपांजलीशी सहमत. उलट शन्नो मी बुरखा घेणार नाही असं म्हणाली आणि अमिरने गप्पपणे का होईना पण ते अ‍ॅप्रिशिएट केले ही केवढी मोठी गोष्ट आहे! यावर अक्षरशः जिहाद होऊ शकतो किंवा एखादा मुस्लिम धर्मगुरू अमिरविरुद्ध फतवा काढू शकतो.
<<<<
अगदी हेच लिहिणार होते :), टोटली मान्य !

डोमेस्टिक नाही अगदी माझ्या क्लिनिकमधलं उदाहरण. पेशंटला तिचा नकाब काढून तपासलं, बाकी हिजाब तसाच होता मग ब्लड रिपोर्ट आणायला ती बाई दोन पावलांवरच्या वेटिंग रूममधल्या नवर्‍याकडे गेली. नवर्याने खण्णकन ठेवून दिलं सगळ्यांसमोर की नकाब न घालता बाहेर का आलीस?

आता वर आलेल्या दोन्ही बाजू पटतायत!
Happy

पण ही लढाई स्त्री-पुरूष नसून मानसिकतेबद्दल आहे हे खरं!
स्त्रियांना समजून घेण्यातच आपण कमी पडतो, हे वैम...
अ‍ॅक्चुअली, खाजगी आयुष्यात हे ज्याने त्याने टाळावं हे सर्वोत्तम सोल्युशन आहे. कारण, जाहीरपणे कितीही चर्चा झाल्या तरी बंद दरवाजाआड जे घडतं ते फक्त दोघांनाच माहित असतं (असं त्या पीडीत कम कौन्सेलर मॅम बोलल्यात) हेही खरं.

काल सत्यमेव जयतेच्या संस्थळावर चिवचिवाट (ट्विट्स) वाचत होतो. काही नमुने इथ लिहायचा मोह आवरत नाही.

१. आमीर खान स्त्रीवादी भूमिकेतून सगळे एपिसोड्स सादर करतो.
२. आमीर जेण्डर बायस्ड आहे. ( याचा अर्थ गद्दार असा चाणाक्ष वाचक घेतील यात शंका नाही.
३. आमीरखानची पहिली बायकोत्याआला का सोडून गेली ?
४. आमीरखान पुरुषांच्या छळाबाबतचा एपिसोड दाखवणार आहे का ?

हल्ली नेटवर फेरफटका मारला तर अशी करमणूक भरपूर आहे .

केदारला अनुमोदन!
आणि 'घोगर्‍या आवाजाच्या बायकांची गाणी'साठी मामींना पण!!!!!

हुंड्याबद्दलच्या एपिसोडमध्ये 'बर्र्‍हाणपूरवाल्या' ला जे जादा महत्व दिले होते तेवढे सोडले तर आमीरने सादर केलेल्या भागांमध्ये फार बटबटीत वाटेल असा मुस्लीम-बायस दाखवला असे वाटले नाही. समजा तसे थोडेफार कोणाला जाणवले असले तरीही त्याने त्याचा 'सेलिब्रेटी' स्टेटस अशा सर्वच समाजांना भेडसावणार्‍या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वापरला याकरिता त्याचे निश्चितपणे कौतुक केले पाहिजे.
त्याने तेथे आणलेली 'शन्नो' तर खासच! गरीब घरात का असेना कोडकौतुकात वाढलेल्या शन्नोने नवर्‍याला एक सणसणित थप्पड ठेवण्याचे दाखवलेले धाडस व नंतर संसार न मोडता स्वतःच्या पायावर उभे राहाण्याचे केलेले प्रयत्न त्यांच्या समाजात तरी अभावानेच दिसत असतील. तिचा नवराही नंतर मारहाण करीनासा झाला याचा अर्थ तो अगदीच अविचारी नसावा असे वाटते.

आमिर अन त्याची टीम जाणून बुजून मुसलमानांना + लाईट मध्ये दाखवत आहेत ही स्वागतार्ह्य बाब आहे. मुख्य प्रवाहामध्ये सामिल होण्यासाठी मुसलमानांच्या चांगल्या बाजू समोर येणे पण आवश्यक आहे. त्या धर्मातील निगेटिव्हिटी सर्वानां चांगलीच माहिती आहे पण + बाजू साठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
>>>> केदार, हा मुद्दा मनापासून पटला. Happy

तुला एक पोरगी आवरत नाय..... मर्दा सारखा मर्द अन बायकोच एकुन घेतोस ............... ह्या सवांदाला सामोर न गेलेलेला पुरुष विरळा च अन संवाद फेकणार्या त दुर्दैवान स्त्री चा पट जास्त ..... शब्द निराळे अस्तील पण रोख एकच.
मुळ संशयात लपलय खरं, अन तो मुळापासून निघायला दोघांनी कष्ट घ्यायला हवेत ........

. उलट शन्नो मी बुरखा घेणार नाही असं म्हणाली आणि अमिरने गप्पपणे का होईना पण ते अ‍ॅप्रिशिएट केले ही केवढी मोठी गोष्ट आहे! यावर अक्षरशः जिहाद होऊ शकतो किंवा एखादा मुस्लिम धर्मगुरू अमिरविरुद्ध फतवा काढू शकतो. >>>>>>>>> उलट मला हीच गोष्ट विचित्र वाटली जेव्हा शन्नो बुरखा बोलली आणि लगेचच आमिरने घुंगटचं नाव पुढे केलं. घुंगटचा काय संबंध?

भान | 19 June, 2012 - 04:49
~ उलट मला हीच गोष्ट विचित्र वाटली जेव्हा शन्नो बुरखा बोलली आणि लगेचच आमिरने घुंगटचं नाव पुढे केलं. घुंगटचा काय संबंध? ~

भानदि मला वाटत मुस्लीम संस्कृती मध्ये बुरखा घेतात आणि हिंदू मध्ये घुंघट किवा डोक्यावरून पदर घेतात. आमीरला हा दोन्ही संस्कृतीमधील सारखेपणा अभिप्रेत असावा. ह्याच्या पेक्षा जास्त काही वेगळ नसाव.

नीधप | 17 June, 2012 - 22:35

कानामात्रावेलांटीसकट अनुमोदन मामी.

नीधप | 18 June, 2012 - 23:11

ह्म्म्म डिजे, केदार, साती... पटतंय

नीधपदि..... दोन्ही विरोधी अभिप्रायाना अनुमोदन देतेस.....पण एक अवडल जेव्हा जे आवडते त्याला अनुमोदन देतेस.....सहीच आहेस!!!

सहज इकडे तिकडे फिरताना या चर्चा सापडल्या:
मिसळपाव
उपक्रम इथली थोडी 'लोकल' आहे, पण मिपा वरची बरी आहे. इथल्या पेक्षा जास्त 'रावडी' असते चर्चा तिथे Wink

अहो वर्तक बाई,
कृपया लबाड किंवा तत्सम वैयक्तिक टिप्पण्या टाळा.

एखादी गोष्ट पटली तर पटली म्हणायला लाज वा अडचण वाटावी एवढी माझी मतं रिजिड नाहीत. ती चर्चेच्या ओघात विचार करताना बदलू शकतात.
बघा समजतंय का ते.

एखादी गोष्ट पटली तर पटली म्हणायला लाज वा अडचण वाटावी एवढी माझी मतं रिजिड नाहीत. ती चर्चेच्या ओघात विचार करताना बदलू शकतात.

>>>>> अगदी अगदी. अनन्या वर्तक मी ही केदारचा मुद्दा पटला असं लिहिलंय. या मुद्द्यावरून वादावादी होण्याची अपेक्षा होती का तुम्हाला? मग तुमचा अपेक्षाभंग वगैरे झाला म्हणून उगाचच काड्या टाकायचा प्रयत्न करू नका. Happy

मामी | 19 June, 2012 - 23:05
~अनन्या वर्तक मी ही केदारचा मुद्दा पटला असं लिहिलंय. या मुद्द्यावरून वादावादी होण्याची अपेक्षा होती का तुम्हाला? मग तुमचा अपेक्षाभंग वगैरे झाला म्हणून उगाचच काड्या टाकायचा प्रयत्न करू नका. स्मित ~

मामी वादावादी व्हावी किवा भांडण व्हाव हा माझा हेतू न्हवता. मुळात असा कधी मनात आलंच नाही माझ्या. तुम्ही केदारना दिलेले अनुमोदन माझ्या वाचाण्यातून चुकून राहून गेले. मी अभिप्राय वाचत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की सहसा धर्म किवा जात ह्या विषयी माणस स्वतःची मत इतक्या सहजासहजी नाही बदलत. पण एखादी व्यक्ती इतक्या सहज स्वतःची मत बाजूला ठेवून परस्पर विरोधी मत तितक्याच सहजतेने आपलेसे करते ह्याच मला अप्रूप वाटल.....इतकच. तुम्ही म्हणालात की तुम्ही सुधा केदारना अनुमोदन दिले आहे मग तुमच्या बाबतीत सुधा एक गोष्ट आवडली.......जेव्हा जे आवडते त्याला अनुमोदन देता. चांगली गोष्ट आहे फार कमी जणांना हे जमत.

तुम्हाला त्रास द्यावा किवा जाणून बुजून तुमच्या भावना दुखवाव्यात असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. पण जर तुमचा गैरसमज झाला असेल त्या बद्दल क्षमस्व.

निधापदि मी माझ्या अभिप्रायामध्ये म्हंटले आहे ....."पण एक अवडल जेव्हा जे आवडते त्याला अनुमोदन देतेस.....सहीच आहेस."

तुमची मत पारंपारिक नाहीत ती बदलतात आणि तुम्हाला जेव्हा जे आवडते त्याला तुम्ही अनुमोदन देता. ह्या तुमच्या विचारांना मी माझ्या प्रतीक्रीयेमध्ये आधीच appreciate केले आहे.
निधापदि मला अजूनही अस वाटत की तुमचा गैरसमज झाला असावा कदाचित तुम्हाला असं वाटल असेल की मी लिहिलेला अभिप्राय Sarcastically लिहिले आहे किवा मी तुमच्या भावना दुखवण्या साठी लिहिले आहे. तसं असेल तर मी तुमचा गैरसमज दूर करू शकते. कदाचित हा गैरसमज माझ्या चुकीच्या मराठी वाक्यरचने मुळे झाला असेल.

आज अजून एक नवीन गोष्ट मला मराठी भाषेच्या शब्द रचनेबद्दल समजून घेता आली. मला आत्ता मराठी मध्ये लिहिणे सुरु केल्यापासून बऱ्याच गोष्टी समजत आहेत. घरात आपल्या परीवारासामावेत सहज कौतुक करण्या साठी किवा आई, ताई जेव्हा म्हणते हुशारच आहेस किवा लबाडच आहेस ह्या सारखी साधी शब्दरचना टीका करण्या साठी वापरण्यात आली आहे असा तुमचा गैरसमज झाला आहे.

इथे एक चूक लक्षात आली आहे माझ्या खुपसे मराठी रोजच्या वापरातील शब्द आणि त्यांचा अर्थ हा वेगवेगळा असू शकतो. मला हे शब्द टाळायला हवेत किवा थोडे अधिक विस्ताराने योग्य अर्थ लिहून मग वापरले पाहिजेत.

माझी मराठी भाषेची चूक माझ्या लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. हे सगळे मी अगदी मनापासून म्हणते आहे. ह्या सगळ्या चुका मला जेवढ्या जास्त समजतील तेवढे मी मराठी भाषेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेन.

इब्लिस यांचा अंदाज खरा असावा. आमच्या परिचयातील दोन जोडपी आहेत ज्यात नवरे एक रात्र तुरुंगाची हवा खाउन आलेत. अगदी मोजक्या लोकंना माहीते आहे. बाकी सर्वांना कळणार पण नाही असा मुखवटा घालुन वागतात्-दोन्ही नवरे आणि त्यांच्या बायका.

इब्लिस, तसे काही नसावे. पण दर वेळी शेकडो पोस्टी पाडत बसायचा कंटाळा आला असणार आता बहुतेकांना.

शिवाय हे सगळीकडेच आहे असे आमीरने म्हणल्यावर यात नेहेमीचे हिंदू-मुस्लिम, भारत-अमेरीका, ब्राह्मण-इतर, काँगेस-भाजप असा काही भांडायला खास विषय नसल्याने गप्प असावेत सगळे.

अमिरने मध्येच बुरख्याला घुंघट म्हटले म्हणुन टीका झाली खरे पण अमिर हा स्वतः मुस्लिम समाजात रहातो. त्याने सतत मुस्लिमांवर टीका केली तर त्याला मुस्लिम समाजाकडुन पण फटके मिळत असणारच.
अशा वेळी त्याने हा बॅलन्स कौतुकास्पदरीत्या सांभाळला आहे.

Pages