Submitted by प्राजु on 17 June, 2012 - 00:09
पावसा थोडा शहाणा वागना
येत जा देऊन थोडी कल्पना
कोण श्वासातून आले अंतरी
जागल्या सार्या कशा संवेदना!
वादळाने बांध जेव्हा फ़ोडला
वाहिल्या मी गाडलेल्या वेदना
आज पाचोळ्यापरी मी वाहिले
वावटळ होईन ही संभावना
आठवे सारे कुण्या काळातले
विस्मृतीची आज भासे वंचना
स्पंदने होतात यांत्रिकतेत अन
मी जिण्याची खूप करते वल्गना!
दांभिकांची रांग या दगडापुढे
सोबतीला वासना अन याचना
फ़ालतू अडकू नको प्रश्नात तू
हे जरा 'प्राजू' मनाला सांग ना
-प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
>>>> देह हा तांत्रीकतेने
>>>> देह हा तांत्रीकतेने श्वास घेतो<<<<
- इथे एक गुरु जास्त आहे.
प्रामाणिकपणे सांगतो, ही गझल फारशी परिणामकारक वाटली नाही.
वादळाने बांध जेव्हा
वादळाने बांध जेव्हा फ़ोडला
वाहिल्या मी गाडलेल्या वेदना
देह हा तांत्रीकतेने श्वास घेतो
आणि जगण्याची मि करते वल्गना
हे शेर जास्त आवडले.
कोण श्वासातून आले
कोण श्वासातून आले अंतरी?
जागल्या सा-या कशा संवेदना!
शेर आवडला.
दांभिकांची रांग या दगडापुढे!
सोबतीला, वासना अन् याचना!
छान आहे शेर!
आणि जगण्याची मि करते वल्गना...........मी असे पाहिजे. वृत्तासाठी अशी सूट घेवू नये.
शेवटच्या शेरातील “फालतू” शब्द कठोर वाटतो.
असे लिहून पहा.........
प्रश्न हे नाहीत तुजसाठी मुळी...
हे जरा 'प्राजू' मनाला सांग ना!
छान आहे गझल
छान आहे गझल
मनापासून आभार!
मनापासून आभार!