१/३ कप गव्हाचे पीठ
१/३ कप सोयाबीनचे पीठ
१/३ कप ओटचे पीठ **
१ टेबलस्पून जवसाची पूड
१/३ कप किसलेले गाजर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
२ टेबल्स्पून साखर
चिमुटभर मीठ
१-२ वेलदोड्याची पूड
१ कप पाणी
कृती - एका भांड्यात जवसाची पूड आणि १ चमचा पाणी घेउन २-३ मिनीटे नीट फेटा. त्यात साखर, गाजर, वेलदोड्याची पूड, मीठ, घालून मिसळावे. त्यात सगळी पिठे घालून नीट मिसळावे. वरुन १ कप पाणी घालुन साधारण भज्याच्या पिठाइतपत पातळ होउ द्यावे. वरुन बेकिंग सोडा घालून चमच्याने भराभर फेटावे. मिश्रणाला थोडे बुडबुडे येतील. तवा तापवुन मोठ्या पळीने एक पळी पीठ तव्यावर घालावे. डोश्याला पीठ पसरतो तसे पसरु नये. वरील बाजुने कोरडे झाले की पॅनकेक उलटावा. असे ३-४ पॅनकेक झाले की त्याचा स्टॅक करुन त्यावर केळ, स्ट्रॉबेरी, वगैरे घालावे. त्यावर मेपल सिरप घालुन खावे. मेपल सिरप नसेल तर मध पण छान लागतो.
** मी इंस्टंट कुकिंग ओट्स मिक्सरमधे बारीक करुन पीठ करते किंवा नॉन फ्लेवर्ड इंस्टंट ओट्मील वापरते. ओट्स नसतील तर गव्हाचे पीठ वापरावे.
मध वापरला नाही तर ही पाककृती वेगन होते.
हाय! कसला
हाय! कसला दिसतोय फोटो. लयी tempting गं मिनोती.