वितंडगड (तिकोना) - भाग २

Submitted by राज जैन on 15 June, 2012 - 04:55

तिकोना हा विसापूर-लोहगडच्या अगदी मागच्या बाजूला पवना धरणाच्या बाजूला वसलेला गड आहे. समोर तुंग उभा असून मध्ये पवनेचे अथांग पाणी व हिरवेगार खोरं असे मनोहरी रूप दिसतं. गडावरून पुर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेच्या टप्पात येतो. तिकोना जरी अवघड श्रेणीतील गड नसला व चढाई सोपी जरी असली तरी थोडी फार काळजी घेत गड चढणे आवश्यक आहे. तुम्ही लोहगड सारखे निर्धास्तपणे येथे वावरू शकत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाच्या मार्‍यामुळे गडाची झालेली हानी. गडावर जाणारे रस्ते हे निसरडे आहेतच, पण पुढे जाणार्‍याच्या निष्काळजीपणामुळे व ठिसुळ दगडामुळे अपघात घडू शकतात त्यामुळे दोन व्यक्तीच्यामध्ये पुरेसे अंतर ठेवणे आवश्यक आहे.

गडावर पाहण्यासारखं खूप काही आज देखील आहे, पाण्याचे टाके, गुहा, बांधलेला तलाव, अवाढव्य असा पसारा नसला तरी नेटका व रक्षणाच्या दृष्टीने बुलंद असे दगडी दरवाजे व बुरुजे अजून ही आपली शान राखून आहेत. अनेकजागी तटबंदी अभेद अशी उभी आहे व गडाच्या गतवैभवाच्या साक्षी देत असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात फक्त पाहण्याची नजर हवी.

मुंबई मार्गे येणार्‍यांसाठी लोणावळा-लोहगड-पवना धरण हा रस्ता आहे व पुण्यामार्गे येणार्‍यांनी पौंड मार्गे जावे, रस्ता व्यवस्थित व चांगला आहे. गडावर खाण्यापिण्याची सोय नाही, पण बालेकिल्लाजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य व रुचकर आहे. गडावर दिवसा एक चौ़कीदार आहे व गडाची साफसफाई व डागडुजी करण्यार्‍या एका संस्थेने त्या व्यक्तीची नेमणूक तेथे केली आहे, व गडावरील त्या संस्थेचे काम पाहून तुम्हाला नक्कीच सुखद धक्का बसेल.

17.jpg18.jpg19.jpg20.jpg21.jpg22.jpg23.jpg24.jpg25.jpg26.jpg27.jpg28.jpg

समाप्त!

गुलमोहर: 

धन्यवाद गंधर्व & विनायक साहेब.

@दादाश्री

हो, खूपच छान दिसतो तुंग. आता तुंगवरून तिकोना पहायला जायचे आहे.