तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे (तरही)

Submitted by इस्रो on 13 June, 2012 - 09:05

तुझ्यामुळे जीवनात माझ्या सदाफुलीसम बहार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

समानतेच्या कुणी कितीही दिल्या जरी घोषणा नव्याने
गरीब-श्रीमंत, सान-मोठा न संपणारी दरार आहे

युगायुगाची करीन सोबत दिले तयाने वचन मला अन
मनास माझ्या जखम करुनी पहा अता तो फरार आहे

कुणास ढकलून तू कधीही नकोस जाऊ पुढे कुणाच्या
तुझ्याकरीता सदैव मागे हटावया मी तयार आहे

इथे कुणा ना कधी कळाले कुठे, कुणी अन कसे मरावे
जिणे कुणाचे जुगार आहे मरण कुणाचे थरार आहे

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०, ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

गुलमोहर: 

छान!
"कुणास ढकलून तू कधीही नकोस जाऊ पुढे कुणाच्या
तुझ्याकरीता सदैव मागे हटावया मी तयार आहे " हा शेर आवडला!