Submitted by आर.ए.के. on 13 June, 2012 - 01:44
चंद्र झाला आता वेडा , रात्र आता सावरेना,
तुझ्या स्पर्शाची ती उब , माझ्या उरात मावेना !
थांबली वेडी झुळुक , पानही आता हलेना ,
तुझ्या वाटेवरुन माझी , काही नजर हटेना!
हसरा तुझा चेहरा , डोळ्यासमोरुन जाइना ,
कधी होते मी स्वतःची , माझी मला आठवेना!
गुलमोहर:
शेअर करा
ही कविता चुकुन काद्म्बरी या
ही कविता चुकुन काद्म्बरी या विभागात टाकली गेली. ती कविता विभागात मी नन्तर टाकली पण कादम्बरी विभागातुन कशी काढायची ते कळाले नाही. क्षमस्व.