आठवणींचे जाळे

Submitted by घुमा on 12 June, 2012 - 13:34

आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे

स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्‍या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्‍या त्या वेढ्यांचा.

थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई

विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.

द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.

http://shabdaspandan.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान कल्पना आहे.
प्रद्युम्न - कोळ्याला आलिंगन नाही म्हटलेलं काही - भूतकाळरुपी कोळ्याला आलिंगन असं वाचा म्हणजे लक्षात येईल सारं...

बहुधा माझ्या प्रतिसादातला विनोद लक्षात नाही आला. त्या अंगानं वाचले तर समजेल मला काय म्हणायचे आहे ते शशांकजी.

सगळ्यांना मन:पुर्वक आभार!

प्रद्युम्न जोक आवडला Happy

शशांक, अभिप्रेत अर्थ लक्षात आणुन दिल्या बद्दल आभार!