Submitted by आर.ए.के. on 12 June, 2012 - 03:10
तो चंद्र आहे वेडा , मी चांदणी नभाची,
त्याला प्रकाशाचे वेड , मला भीती वलयाची !
तो फिरतो नभात , तार कापतो ढगांची,
माझी क्षीणशी भ्रमन्ती , साथ त्याच्या सावलीची!
तो आकाशीचा राजा , सभा त्याची प्रकाशाची,
त्याच्या सभेमध्ये आहे, मला जागा किरणाची!
त्याला क्षितीजाचे वेड , मला तार प्रांगणाची,
त्याची बेधुंद भरारी, माझी चाल कासवाची!
तो आहेच थोडा वेडा , धग सोसतो उराशी,
त्याच्या प्रेमाची ती उब, माझ्या मनाच्या तळाशी!
गुलमोहर:
शेअर करा
माय्बोलीवरील सर्व
माय्बोलीवरील सर्व सदस्यान्च्या वतीने आपले इथे हार्दिक स्वागत
...........................
टायपो सुधारा
कविता छान आहे
टायपो सुधारा कविता छान
टायपो सुधारा
कविता छान आहे+१
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
सुन्दर आहे
सुन्दर आहे
वैभव वसंतराव कु. , विभाग्रज,
वैभव वसंतराव कु. , विभाग्रज, shabdaraja प्रतिसादाबद्दल धन्यवाद!