" | पालखीच्या सोहळ्यात | "

Submitted by विदेश on 11 June, 2012 - 23:15

नामामधे रंगलो मी, ध्यानामधे गुंगलो मी
माउलीत दंगलो मी, पालखीच्या सोहळ्यात |

ओठी विठ्ठलाचे नाम, पाठी विठ्ठलाचे धाम
चित्ती विठ्ठलच ठाम, पालखीच्या सोहळ्यात |

कुणी गातसे अभंग, कीर्तनास चढवी रंग
तो सुटेना संतसंग, पालखीच्या सोहळ्यात |

एकमेका आलिंगूनी, सर्व जाऊ आनंदूनी
भक्तिरसात न्हाऊनी, पालखीच्या सोहळ्यात |

धावे सांजवेळी गाय, तैसे ओढतात पाय
डोळ्यांपुढे विठूमाय, पालखीच्या सोहळ्यात ||

गुलमोहर: 

मस्त वर्णन आहे........काल निगडी (पुणे) येथे पालखी पाहीली आणि अशीच अनुभुती आली......... Happy