च्यायला काय साला कमाल आहे ,
गावात तासन तास दिवसेन दिवस लाईट नाही,
मॉल्स पंचतारांकित हॉटेलात लखलखाट डिस्को ची धमाल आहे
च्यायला काय साला कमाल आहे ,
१० हजार कर्जा साठी शेतकरी जिवानिशी जातोय
स्वीस बॅंकेत खाती खोलून मंत्र्यांची मात्र धमाल आहे
च्यायला काय साला कमाल आहे ,
क्रांती सूर्य छत्रपती शिवाजी महाराज कि जय
मेणबत्त्या जाळून षंड प्रदर्शन समाजाची धमाल आहे,
च्यायला काय साला कमाल आहे ,
सर्वधर्मसमभाव थोथांड भंपक नारा
बाप माझा जोशी , नवरा मात्र जमाल आहे
च्यायला काय साला कमाल आहे ,
मार खा बेदम, जीव हि जाईल, विरोध केला तर अटक ,
दिल्लीच्या आदेशावर पोलिसांची मात्र धमाल आहे
च्यायला काय साला कमाल आहे ,
२०० रुपयाचे तिकीट काढून सिनेमा पाहतो बोर्डर
बोर्डर बघून पण षंड तो षंड,
निद्रिस्त समाजाला माझा " सलाम " आहे
सदरची कविता माझा ओमान मधील मित्राने केली आहे, त्याच्या पूर्व-परवानगीने इथे देत आहे ..........
बाप माझा जोशी , नवरा मात्र
बाप माझा जोशी , नवरा मात्र जमाल आहे>>>>>>
च्यायला,कायच्या काय कमाल आहे.
अरे वा! ओमानमधे त्यांच्या
अरे वा!
ओमानमधे त्यांच्या नवर्याचे नांव जमाल आहे काय?
रच्याकने. षंढ. षंड नाही.