Submitted by Mandar Katre on 10 June, 2012 - 12:26
साधारणतः १९९८/९९ साली एक अनोखे संशोधन केला गेले होते.जगातील सहा जागी काही अतिसूक्ष्म संवेदनांची यंत्रे बसवली गेली होती.त्यात एक ठिकाण उदयपूर हि होते,त्या यंत्राद्वारे शात्राज्ञांनी सूर्याच्या सूक्ष्म ध्वनी कंपनांचा अभ्यास केला वं त्याच्या नोंदी केल्या.त्यांचा असे लक्षात आले,की दर ५ मिनिटांनी सूर्य एक सुंदर मेलेडी ट्युन (ध्वनिलहरी) सोडतो.अशा मेलडी ट्युन्स रेकॉर्ड केल्या आहेत.३ पूर्णांक १/४ दिवस हे रेकॉर्डिंग चालले.त्यात सुमारे कमीत कमी १००० आणि जास्तीत जास्त १०८० अश्या ट्युन्स मिळाल्या.जाणकार काही म्हणतील का???
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://soundcloud.com/univers
http://soundcloud.com/university-of-sheffield/sound-of-the-sun
सनातनवाल्यानाही असे 'नाद' ऐकू
सनातनवाल्यानाही असे 'नाद' ऐकू येतात म्हणे.... तुम्हालाही त्यांचा 'नाद' लागला की काय?
सनातन नाद
stanford and sheffield
stanford and sheffield university चे संशोधन आहे राव, काय पण तुम्ही कुठे पण सनातन चा संबंध जोडताय ?
> साधारणतः १९९८/९९ साली एक
> साधारणतः १९९८/९९ साली एक अनोखे संशोधन केला गेले होते.जगातील सहा जागी काही अतिसूक्ष्म संवेदनांची यंत्रे बसवली गेली होती.
तुम्ही बायसन बद्दल बोलताय का? त्यात उदयपुर नव्हते. तुमचा स्त्रोत दिल्यास बरे होईल.
http://en.wikipedia.org/wiki/Birmingham_Solar_Oscillations_Network
> त्यात एक ठिकाण उदयपूर हि होते,त्या यंत्राद्वारे शात्राज्ञांनी सूर्याच्या सूक्ष्म ध्वनी कंपनांचा अभ्यास केला वं त्याच्या नोंदी केल्या.
ही ध्वनी कंपने नाहीत - अवकाशाच्या पोकळीतुन ध्वनी आपल्या पर्यंत पोचणार नाही. केवळ त्या कंपनांका बद्दल (म्हणजे कंपन अंक - आकडे) बोलत असाल तर गोष्ट वेगळी. काही हर्ट्झ ते काही किलोहर्ट्झचे काहिही आपल्याला ऐकु येईल अशा ध्वनीत रुपांतरीत करता येते. प्रत्यक्षात या प्रेशर वेव्ह्ज आहेत. अप्रत्यक्षरित्या त्यांचा अभ्यास करता येतो. अनेक गोष्टी आपल्याला त्यामुळे कळल्या आहेत. सोप्या शब्दात याबद्दल इथे वाचता येईलः
http://en.wikipedia.org/wiki/Helioseismology
> त्यांचा असे लक्षात आले,की दर ५ मिनिटांनी सूर्य एक सुंदर मेलेडी ट्युन (ध्वनिलहरी) सोडतो.अशा मेलडी ट्युन्स रेकॉर्ड केल्या आहेत.३ पूर्णांक १/४ दिवस हे रेकॉर्डिंग चालले.त्यात सुमारे कमीत कमी १००० आणि जास्तीत जास्त १०८० अश्या ट्युन्स मिळाल्या.जाणकार काही म्हणतील का???
इतके रेग्युलर काही नसते, वैज्ञानीक प्रयोग अशा इर्रॅशनल वेळांकरता चालत नाहीत, याला मेलडी म्हंटले तर संगीतज्ञच काय, पण मेलडी मेकर्ससारखे ग्रूप्स पण पिटतील (अहो ते आपले मेलडी-राक्षस आय मीन मेलडी-रक्षक).
पण हेलिओसाईस्मॉलॉजी लोकांपर्यंत पोचवण्याचे स्तुत्य कार्य केल्याबद्दल धन्यवाद.
सध्या ग्रॅव्हीटी वेव्ह्जचे जोरदार वारे सुरु आहेत. भारत सुद्धा ईंडीगोनामक प्रोजेक्ट्द्वारा या ट्रेजरहंट मधे सामील होतो आहे. या वेव्हजपण ऑडिओ स्वरुपात ऐकता येतात आणि त्याचे बरेच खेळ (गेम्स) बनवले गेले आहेत. पहा खेळून कसे वाटतात ते.
http://www.ligo.org/students_teachers_public/activities.php
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
हे ध्वनी सुंदर आहेत?
हे ध्वनी सुंदर आहेत?